शिवरायांचा विचार कल्याणकारी प्रजा निर्माण करणारा होता – प्रा.सुरनर

37

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18फेब्रुवारी):-आज दि १८ फेब्रुवारी रोजी इसाद येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे कार्यक्रमाचे अध्यक्षबाबासाहेब भोसले अध्यक्ष: तंटामुक्ती समिती इसाद प्रमुख वक्ते शिवश्री प्रा.माधव सुरनर सर संचालक:सुक्सेस ग्रुप ऑफ एज्युकेशन प्रमुख उपस्थिती नितीन बडे पंचायत समिती सदस्य, रामप्रसाद सातपुते चेअरमन इसाद, ज्ञानोबा भोसले उपसरपंच इसाद, बालासाहेब भोसले युवानेते, राजेभाऊ सातपुते गटनेते ग्रा.प.इसाद, काशीनाथ वड ग्रा.प.सदस्य, परशराम राठोड ग्रा.प.सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवरायांचा विचार आजही ३९० वर्षापर्यंत जिवंत आहेत कारण छत्रपती शिवरायांचे विचार ईथल्या प्रत्येक माणसांच्या मनामनात विराजमान झाले आहे.

तर आज महारांजांचे विचार देशात खर्या अर्थाने देशात समता स्वातंत्र्य न्यायावर आधारित स्वराज्य निर्माण केले स्वराज्यातील १८पगड जातीतील लोकांना एकत्रित करून महाराष्ट्रात ३६० किल्ल्यांची निर्मिती करत शेतकरी जगाचा पोशिंदा, शेतकरी जगला तर देश जगेल यासाठी स्वराज्यातल्या शेतकर्यांना शेतसारा माफ करत शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावुन नका, असा आदेश सैन्याला देत , स्त्रिंयाचा सन्मान करणारे महाराज रांजाच्या पाटलाचे हात पाय कलम करत न्यायनिती दाखवुन दिली.

अशा अनेक पैलुंना हात घालत प्रबोधनाचा आवाज बुलंद करत तरूणांनी दंगलीत न जाता शिवरांयाची प्रेरणा घेउन स्वताचे वर्तमान व भविष्य उज्वल केले पाहिजे असा संदेश प्रा.सुरनर सरांनी दिला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती समस्त गावकरी मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन भोसले सर यांनी केले, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रभाकर सातपुते यांनी केले…