छत्रपती शिवाजी महाराज जयंती

31

छत्रपती शिवाजीराजे भोसले १९ फेब्रुवारी शके१६३० ते शके १६८० हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या प्रमोदकर्षाच्या आवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज, राजे या नावाने संबोधित असत. शिवाजींचा जन्म दिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीला शिवकाल असे म्हणतात. शिस्तबद्ध लष्कर व सुघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.

भूगोल आश्चर्यजनक हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून प्राप्त झालेल्या दोन हजार सैनिकांची छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले.किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले.राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरीकिल्ल्यावर इ.स.१६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एका आख्यायिके नुसार शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीला जिजाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती.

म्हणून त्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले होते. छत्रपती शाहजीराजे प्रथम अहमदनगर जिल्ह्यातील निजामशाहच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मणिक अंबर या निजामशहाच्या प्रभावी वझीराच्या मृत्यूनंतर मोगलसाम्राट शहाजानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शाहजीराजे विजापूरच्या आदिलशाहच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशाहने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा बाल शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिका दाखल सोन्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी दादोजी कोंडदेव यांचे मदतीने पुण्याची पुनर्स्थापना करावयास सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले.

शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरू होत्या. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनीच स्फुर्ती दिली. असे काही इतिहासकारांनी सांगितलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्याची स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदविला. सह्याद्रीच्या दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोऱ्याला मावळ आणि खोऱ्यातील सैनिकांना मावळे म्हणत असत. इ.स. १६४७ मध्ये सोळाव्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशाहच्या ताब्यातला तोरणागड जिंकला. आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणागड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्या साली शिवाजीराजांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशाहकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली. आणि त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. छत्रपती शिवाजीराजे जेंव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती राजमुद्रा मराठीत असे सांगते की, ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो.

तशीच शहाजींचा पुत्र शिवाजी राज्यांची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. इ.स.१६४९ मध्ये आदिलशाहने शहाजीराजांना कैदेत टाकले याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवाजींचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहने फत्तेखानास रवाना केले. शिवाजी महाराजांसाठी ती परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शाहजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळता फत्तेखानाच्या पाठलागावर सासवड पर्यंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकर मारले गेले.शिवाजीराजांनी मोगलबादशा शाहजान यास त्याच्या दक्खनच्या सुभेदारा करवी पत्र पाठवून शहाजीराजांसकट स्वतः चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.

पण एक अट घातली त्याबदल्यात शहाजीराजांना सोडायचं व त्यांचा परिणाम म्हणून शिवाजी महाराजांसाठी शाहजहानाने आदिलशाहवर दबाव देखील आणला. आणि परिणामी शाहजीराजे यांची सुटका झाली. आदिलशाहच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशाहने दरबारात शिवाजीराजांना संपवण्याचा विडा उचलला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठया सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाई जवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतावगडावरून त्यांना तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानांनी आग्रह केला होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमानुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.

शिवाजीराजांना अफझलखानाच्या दगाबाजीची कल्पना बहिर्जी नाईक यांनी दिली होती. त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढवले. आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता. तर वाघनखे हाताच्या पंज्याच्या आतमध्ये वळवलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांच्या सोबत जिवाजी महाले हे विश्वासू सरदार होते. तर अफझलखाना सोबत सय्यदबंडा हे तत्कालीन प्रख्यात दांडपट्टा चालवणारे होते. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट घेण्याच ठरलं. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या बलाढ्य अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली व मान दाबली त्यामुळे शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्यावेळी अफझलखानाने कटारीचा वार शिवाजी महाराजांवर केला. परंतु चिलखत असल्यामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे अफझलखानाच्या पोटात खुपसली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यदबंडाने त्याच क्षणी शिवजीराजांवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला. म्हणून शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळे “होता जिवा म्हणून वाचला शिवा”

✒️संकलन:-गजानन गोपेवाड
राज्य समन्वयक महाराष्ट्र