शिवरायांचे विचार घरा-घरात पोहोचवा – प्रा. डाँ. मोतीलाल दर्वे

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.20फेब्रुवारी):-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या कर्मभूमीत जन्माला आलेले एकमेव राजे म्हणून नाव लौकिक आहे दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला आत्मोन्नती ची वाट मोकळी करून स्वराज्य मिळवून दिले अशा ह्या माता जिजाऊ पुत्र राजे साहेबांचे विचार घरा घरात पोहोचण्याचे कार्य या बहुजन समाजाने केले पाहिजे असे गौरवोऊदगार शिवश्री प्रा. डाँ. मोतीलाल दर्वे यांनी केले.

रनमोचन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवश्री वक्ते बोलत होते. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रनमोचन( नवीन वस्ती ) येथील स्थानिक हनुमान देवस्थान व प्रार्थना मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आला होता अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने सोशल डिस्टीघ नियमानुसार पालन करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नीलिमा राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार गोवर्धन दोनाडकर तर प्रमुख वक्ते म्हणून शिवश्री प्रा. डॉ. मोतीलाल दर्वे, शिवश्री विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मोंटू पिलारे, ओम श्री साई कंट्रक्शन आरमोरी चंदूभाऊ बेहरे, बांधकाम सभापती तथा नगरसेवक सागर मने, भूषण सातव, जयंत दहिकर, लहानु पिलारे, ग्रामपंचायत उपसरपंच सदाशिव ठाकरे, माजी सरपंच मंगेश दोनाडकर, ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान, घनश्याम मेश्राम, कोमल मेश्राम, मंदा सहारे, अश्विनी दोनाडकर, पत्रकार विनोद दोनाडकर आदीसह अनेक शिवश्री मान्यवर विविध पक्षाचे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा आयोजक होमराज नाकतोडे, संदीप मांदाडे, नामदेव गुरुनुले , समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन पराग राऊत तर आभार नितेश दोनाडकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी गावातील नवीन युवा पिढी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.