धर्माबाद येथे राष्ट्रवादी कॉग्रेसची बैठक संपन्न…

27

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-९९७०६३१३३२

धर्माबाद(दि.21फेब्रुवारी):- येथे  दि. २०/२/२०२१ रोजी,
शासकीय विश्रामगृहात , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका धर्माबाद च्या संघटनात्मक पुनर्बांधणी हेतू तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडीसाठी,धर्माबाद तालुक्यातील व शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्याकरीता पक्ष निरीक्षक म्हणून बिलोली तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्या वर,पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. हरिहरराव भोसीकर,यांनी जबाबदारी दिल्यानुसार ,आज प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा करून मते जाणून घेतले.

व तसा अहवाल श्रेष्ठी कडे देणार,या प्रसंगी बिलोली तालुकाध्यक्ष नागनाथराव पाटील सावळीकर,वि. स. उपाध्यक्ष गौसोद्दीन कुरेशी,प. स. चे माजी सभापती वेंकट पांडवे, राष्ट्रवादी चे सामाजिक न्याय ता अध्यक्ष गंगाधर प्रचंड,अल्पसंख्याक ता अध्यक्ष सादिक पटेल,तसेच धर्माबाद चे कार्यकर्ते उपस्थित होते.