नवापूर शहरातील असलेले स्वस्त धान्य दुकान आर.ए.आर मेमन या दुकानदाराचे परवाना रद्द करावा- दर्शन सुरेश ढोले

52

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

नवापूर(दि.24फेब्रुवारी):- शहरात असलेली आर.ए.आर मेमन या दुकानदारच्या कायमचा ग्राहक आहे . परंतु केंद्र शासनाकडून या पुर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यात व शहरात पुरवठा निरीक्षक यांच्या आदेशानुसार शिधा – पत्रिका तपासणी नमुना असा फार्म प्रत्येक ग्राहकाला भरण्याचे केंद्रशासनाने आदेशित केलेले आहे . परंतु फार्म भरुन देत असतांना त्या सोबत पुरावा म्हणून 1 ) भाडेपावती 2 ) निवासस्थानाच्या मालकी बद्दलचा पुरावा 3 ) LPG जोडणी क्रमांक 4 ) विजेचा देयक 5 ) टेलिफोनामोबाईल देयक 6 ) बँक पासबुक 7 ) ड्रायव्हिंग लायसन्स 8 ) मतदार ओळखपत्र , 9 ) आधार कार्ड 10 ) ओळखपत्र ( कार्यालयीनाइतर ) वरील पैकी कोणताही किमान एका कागदपत्राची पुर्तता करावी , असा अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांक : शिवाप -2021 / प्र.क्र .04 / नापू -28 दि .28 जानेवारी 2021 रोजी असा आदेश देण्यात आले आहे.

परंतु आम्ही ग्राहक शासनाने दिलेल्या आदेशानुसार शिधपत्रिका तपासणी नमुना फार्म भरुन त्या सोबत पुरावा म्हणून आधार कार्ड जोडले होते . तसेच तो फार्म घेऊन आम्ही आमच्या रेशन दुकानदार म्हणजेच आर.ए.आर मेमन यांच्याकडे जमा करण्यासाठी गेलो होतो परंतु त्यांची दुकान त्याची दुकान उघडण्याची वाट पाहत होते . तो पर्यंत 10 ते 15 ग्राहक त्याची येण्याची वाट पाहत होते . नही , नही तो तुम्हारा रेशन कार्ड रद्द करदुंगा अशी दमदाटी करु लागला व मी स्वत : फार्म भरलेला त्याच्याकडे जमा करणेसाठी गेलो असता रेशन दुकानदार यांनी माझा फार्म भरलेला माझ्या अंगावर फेकुन दिला . आम्हांला जोर – जोरात औरइन सांग लागला हम शासन का आदेश का पालन नही करते.

तुझे फार्म मे दिऐ गये दस पुरावे जोडने होंगे असे जोर – जोरात ओरडून सांगु लागला की तुझा फार्म मिलींद निकम त्याच्या मनमानी पध्दतीने वागु लागला . त्यांनी आम्हाला सांगीतले तुम पहले फार्म करो फिर बादमें रेशन कडे जमा कर नाहीतर रविंद्र कानडे कडे जमा कर असे दमदाटीच्या भाषेत उध्दटपणे बोलु लागला व दुंगा सदर रेशन दुकानदार प्रत्येक ग्राहकाला शारीरीक व मानसिक त्रास देतो . तसेच आम्ही पुरवठा निरीक्षक मा . मिलींद निकम साओं व जिल्हा पुरवठा अधिकारी मा . महेश शेलार साणे , व मा . रविंदर कानडे यांच्या भ्रमणध्वनीवर या तिन्ही अधिकाऱ्याशी बोलून फार्म बद्दल विचारणा केली व आर.ए.आर मेमन च्या रेशन दुकानावरुन संपर्क साधून त्यांच्याकडून फार्म सोबत जोडले जाणारे कागदपत्राची माहिती घेतली असता त्यांनी सांगीतले की , 10 पैकी कोणताही एक पुरावा फार्म सोबत जोडायचा आहे.

परंतु आर.ए.आर मेमन हे आमची व ग्राहकाची ऐकुन घेण्याची मानसिकतेत नाही होता व तो आम्हाला दमदाटी व दादागीरी करीत होता . तसेच मेरे आठसौ ग्राहक है में सबको जबाब देते फिरु कया में अधिकारी को दरमहनें का पाकेट देता हूँ कोई भी अधिकारी मेरा कुछ नही कर सकते . असे जोर – जोरात सांगु लागला व त्यांनी आम्हाला अनाजापासून वंचित ठेवले व त्यांनी सांगीतले की , तुझे मेरी तक्रार जहाँ करनी है वहाँ कर असे तो मला बोलु लागला व आसत्याच्याकडे त्याच्या दुकानाची तक्रार बुकची मागणी केली परंतु देऊ लागला नाही . मला सांगु लागला की मेरी तक्रार तहसिलदार को जाके करदो में अधिकारी को पाकीट देता हूं अधिकारी मेरा कुछभी नही कर सकते . दुकानदार हा दर महिन्याला ग्राहकांसोबत हा दुकानदार वाद घालत असतो . तसेच त्याची तक्रार करणेसाठी कोणीही पुढाकार घेत नाही.

कारण की , तो गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्कात आहे व कोणीही त्याची तक्रार केली तर त्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना दारु पाजुन व मटन खाऊ घालून त्या तक्रारदाराच्या घरी घेऊन जाऊन मारहाण करतात . असे या पुर्वी तक्रारदारा सोबत घटना घडलेल्या आहे . म्हणून सदर दुकानदार हा दर महिन्यास प्रत्येक ग्राहकांसोबत वाद विवाद करीत असतो . म्हणून सदर आर.ए.आर मेमन यांच्या रेशन परवाना तात्काळ रद्द करण्यात यावे . सदर तक्रारीवर दहा दिवसात दखल न घेतल्यास आम्ही ग्राहक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार याची प्रशासनाने नोंद घ्यावी