कोरोणा सकंटापैक्षाही जातीय अत्याचार जास्त घातक – दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ घनःशाम भोसले

29

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.25फेब्रुवारी):- महाराष्ट्रात जातीय द्वेषातून दलितांवर जीवघेणे हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत.
लोहा तालुक्यातील शिवनी येथे राहणारा संदिप दुधमल शेतावरून साईकल वरून घरी येत असताना रस्त्यात बसवेश्वर बोंमनाळे आणि प्रल्हाद जामगे यांनी संदिप दुधमलच्या सायकला धडक दिली. त्यानतंर संदिपने जाब विचारला की तुम्ही मला धडक मारली, तेव्हा जातीयवाद्यानी खाली उतरून शिवीगाळ करून संदिपला मारहाण केली. ते एवढ्यावर न थांबता जातीयवाद्यानी संदिप दुधमल च्या घरी जावून ८ ते १० जणांवर कुर्हाडी तसेच काठ्यानी संदिप दुधमलच्या घरावर हल्ला केला. संदिपची आईवडिल,भाऊ, चुलता चुलत बहिण यांना घरात घुसून मारहाण केली.

मारहाण सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेला गणेश एडके हे या बौध्द तरूणांच्या डोक्यामध्ये कुर्हाडीने एकाने घाव केला यात तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घाव हा अतिशय खोल असून गणेश एडके हा अतिशय गंभीर जखमी झाला आहे. मृत्यृशी तो झुंज देत आहे. या घटनेने लोहा तालुक्यात भितीचे वातावरण पसरलेले आहे.

देश स्वातंत्र होऊन कित्येक वर्षे लोटली तरिही इथली जातिव्यवस्था नष्ट झाली नाही. आजही जातीय द्वेशातून कत्तली केल्या जातात. दंगली घडवल्या जातात. जगात कोरोणा व्हायरसमुळे कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत कोरोणा मृत्यु परवडेल पण जातीय अत्याचार कधिही परवडणार नाही. कोरोणा व्हायरसपेक्षाही जास्त घातक जातीय अत्याचार आहे.

दलितावरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने वेळीच लक्ष घालून ठोस पावले उचलावीत आणि संदिप दुधमल, गणेश एडके तसेच त्यांच्या कुटुबांवर हल्ला केलेल्या जातीयवाद्यांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी असे आवाहन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी सरकारला केले आहे.

चौकट :- महाविकास आघाडी तसेच केंद्र सरकाराच्या काळातही मुस्लिम,बौध्द दलित समाज असुरक्षित – डाॅ. घनःशाम भोसले.