कर्तव्य आणि नैतिक जबाबदारीचा विसर

29

आज कोरोना महामारीच्या नावाखाली जनतेच्या एकंदरीत स्वातंत्र्यावर बंदी आणुन त्यांना गुलामगीरीची सवय लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना सर्वसाधारण फ्लु असताना त्याला महामारी घोषित करून जनतेचे स्वांतत्र्य हिरावून घेणे आणि त्याला त्याच्या मनानुसार जिवन जगु न देणे म्हणजे गुलामीच असते. कोरोना महामारी आहे तर सरकारने सांगितले तेव्हाच आकडे वाढतात आणि सरकारने सांगितले तेव्हाच आकडे कमी होतात. सुरवातीला कोरोना ची भिती मनामध्ये घालून संपूर्ण देश लॉकडाऊन करून लोकांचे रोजगार, उद्योग, पोटभरण्याचे साधने हिसकावून घेतले. नंतर नंतर हळूहळू कोरोना ची संख्या वाढत गेली आणि लॉकडाऊन हळूहळू उघडत गेले. जर कोरोना घातक संसर्गजन्य महामारी होती तर हळूहळू लॉकडाऊन उघडताना कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढायला पाहिजे होते पण नाही वाढले, सर्वत्र लोक आनंदाने भयमुक्त जिवन जगुन आपल्या उदरनिर्वाहाची सोय लावण्याच्या तयारीत असताना तिन चार महिने लपून बसलेला कोरोना अचानक वाढायला लागला.

तो संसर्गजन्य आहे, घातक आहे, नियंत्रणात येऊ शकत नाही तर जेव्हा लॉकडाऊन हळूहळू उघडले तेव्हा रुग्ण जास्त वाढून मृत्यु दर वाढायला पाहिजे होता. कारण लॉकडाऊन घडताना वेळेसच कोविड सेंटर बंद करून घरीच कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला गेला. जर घरिच कॉरंटाईन राहुन कोरोनाचा उपचार आपण करू शकत होतो तर लाखो करोडो रूपये खर्च करून कोविड सेंटर सुरुच केले कशाला? कोरोना संसर्गजन्य आणि आणि जिवघेणा आहे तर कोविड पॉझिटीव्ह व्यक्तिला घरीच कॉरंटाईन राहण्याचा सल्ला देऊन घरातील लहान मुले, म्हातारे लोक यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव आरोग्य खाते आणि सरकार यांना नव्हती का? कोरोना महामारीच आहे आणि औषधी उपलब्ध नाही तर लोक वाचलेच कसे? आणि हॉस्पिटलमध्ये असे कोणते उपचार केले की औषधी नसताना कोरोना ला निकामी केले. ज्या यंत्राने ज्या औषधीने कोरोनाला शरीरातून निकामी केले त्यालाच औषधी म्हणून का मान्यता दिली नाही.

कोविड हा महामारी व्हायरस आहे आणि तो दोनहजार एकोणीस मध्ये निर्माण झाला तर मग विज्ञान शाखेला सात वर्षे अगोदर कोविड फ्लू कसा शिकवला गेला? विज्ञान शाखेत शिकवणाऱ्या प्राध्यापकांना आणि शिकलेल्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न का नसेल पडला. कोरोना फक्त एक फ्लु आहे मग त्याचे रूपांतर महामारी मध्ये कसे होईल आणि कोविड-१९ हे नाव कितपत योग्य आहे. जर कोरोना अगोदर पासुनच असेल तर. थोडक्यात कोरोना महामारीच्या नावाखाली देशातील पैसा खर्च करून देशाची तिजोरी व लोकांचे खिसे खाली करून भिती निर्माण करून दिली. सरकारचे कर्तव्य आहे जनतेची काळजी घेणे पण मनात भिती घालून लोकांना गुलाम बनवणे हे सरकारी नितीमत्तेला शोभणारे नाही. कोरोना विषयी लोकांच्या मनात भिती निर्माण करण्याचे काम मिडीयाने केले आहे. दिवसभर ओरडून ओरडून लोकांना कोरोना महामारी आहे आणि रोज किती लोक मरातात याची आकडेवारी सांगत होते. डब्लु एच ओ च्या गाईडलाईन नुसार मार्च विस नंतर कोणत्याही प्रकारचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असे गृहीत धराण्याचा आदेश दिला.

मिडियावाल्याने मृतकांचे आकडे वाढवून सांगितले, पण सांगतात मिडीयाने डब्लु एच ओ ची गाईडलाईन कधीच सांगितली नाही की प्रतेक मृत्यू चे कारण कोरोना गृहीत धरा. म्हणजे मिडीयाने जनतेची बाजु न घेता सरकारची बाजु घेऊन जनतेची दिशाभूल केली.सरकारने तर आपले योग्य कर्तव्य पार न पाडता नैतिक जबाबदारी देखील पार पाडली नाही. आणि त्यापुढे दोन पाऊल होता तो म्हणजे मिडीया. भिती आणि फक्त भिती मनात भरून जनजिवन विस्कळीत करण्याचे काम मिडीयाने केले. सरकारचे गुणगान गाताना हजार हजार किलोमीटर चालत जाणाऱ्या लोकांवर मिडीया चा कँमेरा गेला नाही. उन्हातान्हात लहान मुले, पायाला चप्पल नाही, खायला अन्नाचा कण नाही, फक्त जिव वाचवण्यासाठी रक्ताच पाणी करून घराची वाट धरणारे लोक मिडीयाला दिसले नाही. करोडो लोकांवर उपासमारीची वेळ आली परंतु कित्येक चुली लॉकडाऊन मध्ये पेटल्या नाही याची माहिती मिडीयाला मिळालीच नाही, भुकेच्या व्याकुळतेने पोटात वादळ उठलेले असताना उपाशी मेल्यापेक्षा स्वतः जिवन संपवून मेलेले बरे असे कितीतरी कुटुंब उध्वस्त झाले पण प्रामाणिक मिडीया सरकारच्याच बाजुने उभे राहुन आपली काम ईमानदारीने करत होता.

खर पाहीले तर मिडीयाचे काम काय आहे हेच मिडीया या सात वर्षात विसरून गेला आणि कोरोना पासून मिडीया तर मिडीया राहलाच नाही. पण आदर्श आणि इमानदार मिडीयाचे काम असते विरोधी पक्षाची भुमिका घेऊन जनहिताचे कार्य दाखवून प्रोत्साहन देणे. आणि जेव्हा जनता संकटामध्ये असते तेव्हा जनतेच्या बाजूने उभे राहण्याचे काम मिडीयाचे असते. खोटे आकडे खोटी महामारी मिडीया ने रंगवून सांगितली. परंतु कोविड मुळे मृत्यू झालेल्या परिवाराला भेट देऊन त्या रुग्नाची पुर्व माहिती घेतली नाही. रुग्णाला अगोदर काही आजार होते का? त्याची मृत्यू पुर्वीची परिस्थिती कशी होती? अगोदर कोणते उपचार सुरू होते, किती दिवसापासून सुरु होते? कोविड झाला तर कोणत्या लोकांच्या सानिध्यात आला होता? सानिध्यात आलेल्या लोकांची परिस्थिती कशी आहे. कोविड मध्ये घरातील कर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने त्या घरच्या सदस्याची परिस्थिती कशी आहे? उदरनिर्वाहासाठी काही साधन आहेत का? सरकारने काही मदत केली का? कुटूबाला जगण्यासाठी कोणता पर्याय आहे? अशा प्रश्नांची उत्तरे टिव्ही चँनलवाल्यांनी कोविड मृत लोकांच्या नातेवाईकांकडून घेणे गरचेचे असताना किती टिव्हिचे कँमेरे खरच रुग्णांच्या घरी गेले आणि चोकशी केली तर याचे उत्तर शुन्य येते. टिव्ही चँनलवाल्यांनी लोकांची एवढी दिशाभूल करून एवढी भिती निर्माण करुन दिली होती की जस काय मिडीया सरकारचा गुलामच आहे सरकारने सांगितले तेच ऐकायचे बाकी कोणावर लक्षच नाही द्यायचे. लाचारी आणि गुलामी काय असते हे खरच शिकण्यासारखे असते.

मध्यंतरी निवडणुका होत्या, धार्मिक कार्यक्रम होते म्हणून कोरोना रजेवर गेला होता तर कोरोना रजेवर असताना च कोविड वँक्सिन तयार केली गेली. वँक्सिन तयार करण्याच्या अगोदरच त्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तरी वँक्सिन तयार झाली टिव्ही वर जाहिरात येऊ लागली. जेव्हा पहिल्या टप्प्यात डॉक्टर लोकांना वँक्सिन घेण्याची वेळ आली तेव्हा डॉक्टरांनी चक्क नकार दिला. मग अजून प्रश्न तयार झाले. जर डॉक्टर वँक्सिन ला विरोध करतात याचा अर्थ वँक्सिन वर विश्वास नाही ? आणि दुसरा म्हणजे जर कोविड साठी वँक्सिन डॉक्टर च घेत नाही तर कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांनी करोडो रुपये नेमके कमावले तरी कसे? पैसा कमविताना डॉक्टर चुप बसले आणि लस घेतांना आंदोलन करयला लागले. याचा अर्थ लस सुरक्षित नाहीच. वँक्सिन घेतल्यानंतर चक्कर येऊन पडते, थकवा येणे, वँक्सिनमुळे मृत्यू देखील झालेले आहे परंतु टिव्हिवाले एकही शब्द कोविड च्या विरोधात बोलताना दिसत नाहीत. वँक्सिन नंतर कितीतरी लोकांचा मृत्यू झाला, कितीतरी लोकांना अपंगत्व आले, तरी सरकार वँक्सिन अनिवार्य करत आहे. आणि वँक्सिन सुरक्षित असल्याचा दावा करत आहे.

सदर बाब सरकारने लिहुन द्यावी आणि वँक्सिन मुळे ज्यांचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना उदरनिर्वाह चे साधन उपलब्ध करून द्यावे. यावर मिडीया गप्प, डॉक्टर गप्प आणि सरकारची मनमानी आहे. जे सत्य असत्य तपासून सत्याचा स्विकार करून असत्याचा विरोध करत नाहीत ते लोक जिवंत दिसत असले तरी विचाराने व कृतीने मेलेले असतात. कोविड ला विरोध करायचे सोडा पण साधं सत्य बोलण्याची हिंमत आज टिव्हिवाल्यांकडे राहली नाही. जनतेचा आवाज मोठा करून सरकार पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी मिडीयाची असताना, जनतेचा आवाज दाबुन सरकारची भक्कम पणे मांडण्याचे काम मिडीया करत आहे हे इतिहासात पहिल्या वेळेस होत आहे. जेव्हा कोविड संदर्भात लिहले जाईल तेव्हा इलेक्ट्रॉनिक मिडीया ने कोणते कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली याचा लेखाजोखा येईल. इलेक्ट्रॉनिक्स मिडिया वाल्यांनी स्वत:ला एवढे लाचार आणि गुलाम बनवून ठेवले की जर उद्या सत्तेत बदल झाला तर यांना यांचेच मुद्दे ऐकवले तर लाज वाटेल, थोडक्यात काय तर प्रत्येकाला काही कर्तव्य असतात आणि काही नैतिक जबाबदाऱ्या असतात.

जसे नागरिकांचे कर्तव्य आहे कायद्याचे व शासनाच्या आदेशाचे पालन करणे, आणि नैतिक जबाबदारी काय आहे तर पालन करण्याची भावना माझ्या च मनात निर्माण झाली पाहिजे, दुसऱ्या ने सांगितल्या नंतर मी काही करेल ही बाब नक्कीच जबाबदारी ची नाही. सरकारने सर्व विचार करून जनतेच्या कल्याणाचा निर्णय घेणे गरजेचे असताना, लॉकडाऊन ची भिती मनात घालून देऊन नेमके जनतेचे कल्याण होते. पुर्वीच्या लॉकडाऊन मध्ये रुग्णाची संख्या कमी झाली होती? मग लॉकडाऊन ची भीती मनात निर्माण करून लोकांना भयभीत करून दिशाभूल करण्यासाठी सत्तेचा वापर करणे कितपत योग्य आहे? महामारीच्या नावाखाली जे जनजीवन विस्कळीत झाले ते अजून जागेवर यायला बराच वेळ लागणार आहे. याची जाणीव असणे गरजेचे आहे. लोकांना रोजगार, शिक्षण आणि स्वातंत्र्य पाहिजे सरकार हे सर्व लपवण्यासाठी लॉकडाऊन ची भिती दाखवून कर्तव्य व नैतिक जबाबदारी पासुन दूर जाऊन जनतेची दिशाभूल करत आहे.
*************************************
✒️लेेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************