नेरी – चिमुर रोडवर अपघात ओव्हरटेकच्या नादात झाला अपघात

39

🔺दोन गंभीर जखमी

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.26फेब्रुवारी):-चिमुर रोडचे रूंदीकरणाचे काम चालु असुन चिमुरला जात असतानी प्रवाशांनी भरलेल्या तीन चाकी ऑटोला स्कॉर्पीओ गाडीने ओव्हरटेक करीत असतानी हा अपघात कळमगांव जवळ २६ फेब्रुवारीला दुपारी ११ वाजता घडली.नेरी – चिमुर रोडनी वाहतुक मोठ्या प्रमाणात चालत असतो.आणी त्यातच या रोडचे रूंदीकरणाचे काम सुध्दा चालु आहे.

चिमुरला जात असलेल्या प्रवाशांनी भरलेल्या तीन चाकी ऑटोला स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. – ३१ ,डीके .-५२४९ या वाहनाने ओव्हरटेक करीत असतानी ऑटोला घासत नेवुन तोल ऑटोचा बीघडवला व त्यामुळे ऑटोतील नेरी येथील रहीवासी इब्राहीम शेख वय – ५५ वर्ष या प्रवाशाला व ऑटो चालक वीनायक वैरागडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

ही स्कॉर्पीओ चीमुर येथील पटेल यांची आहे.पुढील उपचारासाठी उपजील्हा रूग्णालय चिमुर येथे गंभीर जखमीना पाठवीण्यात आले.या घटनेची माहीती पोलीस वीभागाला होताच पोलीस घटना स्थळी पोहचले .व पंचनामा करुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे