शिक्षक भारती विशेष शाळा विभाग तर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष शाळेतील समस्यांचे निवेदन सादर

27

🔸जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी जाणून घेतल्या समस्या…समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.26फेब्रुवारी):-शिक्षक भारती विशेष शाळा विभागातर्फे चंद्रपूर जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांना विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. शिक्षक भारती विशेष शाळा कर्मशाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना चंद्रपूरची नवीन कार्यकारणी निवड गठीत झाल्याबाबतची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले.

निवेदनात चंद्रपूर जिल्ह्यातील कर्णबधिर ,अंध , मतिमंद, अस्थिव्यंग तसेच कर्मशाळा इत्यादी शाळेमध्ये कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. वेळोवेळी सदर कर्मचाऱ्यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु बऱ्याच समस्या अजूनही तशाच प्रलंबित असल्याने पुढील समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
यामध्ये दर महिन्याचे मासिक वेतन एका नियोजित तारखेपर्यंत व्हावेत जेणेकरून कर्जाचे हप्ते थकित होणार नाही,अनुज्ञाप्ती चे प्रस्ताव माननीय दिव्यांग कल्याण आयुक्तालय पूणे यांच्याकडे त्वरित पाठवून अनुज्ञप्ती करिता पाठपुरावा करावा,भविष्य निर्वाह निधीसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव पाठवले आहेत त्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी प्रदान करावी,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन बाबत चे सर्व प्रश्न सोडवावेत,निवड श्रेणी ,वरिष्ट श्रेणी, कालबद्ध, चटोपाध्याय त्रिस्थरीय वेतन श्रेणी यांचे प्रस्ताव तपासून पडताळणीसाठी माननीय दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे पाठविण्यात यावे.
पूर्णवेळ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदाची नियुक्तीसाठी प्रयत्न करावे जेणेकरून दिव्यांगाच्या विशेष शाळेतील शिक्षक शिक्षकेतर व शाळांचे प्रश्न सोडविण्याकरिता सुलभ होईल या मागण्यांचा समावेश आहे.सुरेश पेंदाम जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी त्वरित संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून नियमित पगारासाठी पत्र काढून सर्व शाळांना ते पत्र देऊन २५ तारखेच्या आत पगारपत्रक टाकावे अशा सूचना दिल्या तसेच कार्यालयामधनिवेदनात काही प्रस्ताव प्रलंबित आहे ते सर्व प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सूचना दिल्या.
निवेदन देताना शिक्षक भारती संघटनेचे विभागीय सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे,शिक्षक भारती विशेष शाळा विभागाचे जिल्हा अध्यक्ष महेश भगत सर, जिल्हा सचिव रामदास कामडी,जिल्हा कार्याध्यक्ष पद्माकर मोरे,जिल्हा सहसचिव सुहास देवळे, सदस्य विश्वास बनकर,जयश्री पडळकर आदी शिक्षक भारती परिवार पदाधिकारी उपस्थित होते.