नेर येथील जि.प.शाळेत शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास गटशिक्षणाधिकारी यांची भेट

28

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.6मार्च):- दिनांक ५ मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषद शाळा नं.१,४,५ नेर येथील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास श्रीम.सुरेखा देवरे गटशिक्षणाधिकारी पं.स.धुळे यांनी भेट दिली.शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.वयोगट ३ ते १८ वर्षे मधील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी दिनांक १ मार्च ते १० मार्च पर्यंत राज्यभरात शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.गावातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा उद्देश आहे.

या सर्वेक्षणात नेर गावातील महादेव भिलाटी, सुमनबाई भिलाटी, नूरनगर बेघर भिलाटी, कंडक्टर भिलाटी, कसाड भिलाटी या आदिवासी वस्त्यांचे सर्वेक्षण सुरू होते.शाळेपासून या वस्त्या लांब अंतरावर असून मध्यभागी पांझरा नदीचा अडसर आहे.पावसाळ्यात २ ते ३ महिने नदीपात्रात पाणी असते तसेच अक्कलपाडा धरणातुन पाण्याचे आवर्तन सोडले असता देखील येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.पर्यायाने गुणवत्ता दिसून येत नाही.म्हणून या समस्या सोडवण्यासाठी आज श्रीम.सुरेखा देवरे गटशिक्षणाधिकारी,
श्री.संजीव विभांडीक शिक्षण विस्तार अधिकारी, श्रीम.गायत्रीदेवी जयस्वाल सरपंच नेर, श्रीम.निर्मला कदम केंद्रप्रमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पालकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.या वस्त्यातील विद्यार्थ्यांना नवीन शाळा उघडण्यात यावी त्यासाठी ग्रामपंचायत ठराव व जागेचा उतारा, नकाशा देण्यास संमती सरपंच श्रीम.गायत्रीदेवी जयस्वाल यांनी दर्शवली तसेच नेर मधील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.गणू भाऊ जयस्वाल, श्री.राजधर अमृतसागर, श्री.जीवन भिल, श्री.दयाराम दादा, श्री.रामदास सोनवणे, श्री.मधुकर सोनवणे, ग्रामस्थ बंधू भगिनी, शिक्षक श्री.रामभाऊ पाटील, श्री.योगेश कोळी, श्री.प्रकाश बागुल, श्री.पुरुषोत्तम शिंदे, श्री.संजय थोरात इ.उपस्थित होते.