श्री सिद्धगिरी कृषी तंत्र विद्यालय, कणेरी मठच्या विद्यार्थ्यानी राबविले सेंद्रिय शेतीची निगडीत विविध उपक्रम

31

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.13मार्च):-श्री सिद्धगिरी कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये गांडूळ खत, गांडूळ अर्क, कंपोस्ट खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, हायड्रोपोनिक्स, मशरूम शेती,अझोला निर्मिती आणि इतर विविध सेंद्रिय निविष्ठांचा समावेश होतो.
कणेरी मठ येथे नुकतेच सुरू झालेल्या कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मठावर सेंद्रिय शेतीला पूरक अशा विविध उपक्रमांची थोड्याच कालावधीत निर्मिती केली आहे.

उन्हाळा हंगामात हिरवळीच्या चाऱ्याचा तुटवडा असतो त्यासाठी हायड्रोपोनिक्स, अझोला, सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत, कंपोस्ट खत, सेंद्रिय पद्धतीने कीड व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी दशपर्णी अर्क जे दहा वनस्पतीं पासून बनते, निंबोळी अर्क, मशरूम निर्मिती, इतर विविध उपक्रम या कृषी तंत्र विद्यालयात राबविण्यात येत आहेत यासाठी कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य मीरा तांबे मॅडम, भाटले सर, लांबे मॅडम व निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

आजच्या करोना च्या काळात विद्यार्थ्यांनी नोकरीवर अवलंबून न राहता अशा विविध उपक्रमांची माहिती घेऊन उत्तम व्यवसायिक बनणे ही काळाची गरज आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषी तंत्र विद्यालय, कणेरी मठ हे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नव्याने सुरू झाले आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना दोन वर्ष कालावधीत सर्व शेतीशी निगडीत विषय शिकवले जातात. सदर चा अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकवला जातो. यासाठी विद्यार्थी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात विविध कृषी पूरक उद्योग ही शिकवले जातात त्याचा भविष्यात विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो.