आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत पाणी टंचाई आढावा बैठक

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि 13मार्च):- दि. 12 मार्च शुक्रवार रोजी पंचायत समिती गंगाखेड येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत टंचाई आराखडा बैठक घेण्यात आली.जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील संभाव्य पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस तोंड देण्यासाठी माहे जानेवारी ते मार्च 2021 आणि माहे एप्रिल ते जून 2021 या दोन तिमाही कालावधीची कृती आराखडे जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयस सादर केले आहे. या आराखड्यास परभणी जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली दिली असूनसदरील आराखडा विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग यांच्याकडे पाठवून दिला आहे.

टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाई कृती आराखडा जानेवारी 2021 ते मार्च 2021 मध्ये त्या अनुषंगाने गंगाखेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे त्या गावाकरिता नवीन विंधन विहिरी, कुंपण नलिका तसेच पुर्वी करण्यात आलेल्या नळ योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, प्रगतीपथावरील पाणी पुरवठा योजना, विहीर किंवा विंधन विहिरीचे / बोअरचे अधिग्रहण करने, विहिरीची खोली व गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे इत्यादी कामे करून लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्या करिता विविध उपाययोजना राबविल्या जाव्यात.

टंचाईग्रस्त गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा, कोणत्याही गावाची पाण्यामुळे गैरसोय होणार नाही मी खपून घेणार नाही याकरिता आपण वाट्टेल ते प्रयत्न करूयात असे आ. रत्नाकर गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.या बैठकीस जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा श्री एंबडवार, तसिलदार स्वरूप कंकाळ, विकास अधिकारी श्री चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, सभापती छाया ताई मुंडे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मुंडे, नितीन बडे, शिवाजी पवार यांच्यासह गंगाखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक तलाठी या बैठकीस उपस्थित होते.