कोरोना संकटामुळे उपासमार झालेल्या गरीब कुटुंबाना आर्थिक मदत द्यावी

38

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे मागणी

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.16मार्च):- मार्च २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत संबंध देशांमध्ये आवश्यकतेनुसार वेळोवेळी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रतिबंधक उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले होते. केंद्र व राज्य शासनाचा या निर्णयाचे सबंध देशातील जनतेने खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केले परंतु या लॉकडाउनच्या काळात मोलमजुरी करून जगणारी गोरगरीब जनता यांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उपासमारीची वेळ आलेल्या गरीब कुटुंबाना केंद्र सरकार व राज्य शासनाने आर्थिक मदत करावी अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे उपविभागीय अधिकारी परळी वै. यांचेमार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

गवत विकून जगणारी महिला, बांधकाम मजूर, शेतमजूर यांची आर्थिक स्थिती बिघडली असून या सर्वसामान्य नागरिकांसमोर जगायचे कसे, मुलांचे शिक्षण लता कपडे व लग्न करायचे कसे, वेगवेगळ्या बँकेचे कर्ज फेडायचे कसे या आर्थिक विवंचनेतून सर्वसामान्य नागरिक जीवन कंठीत करत आहे दारिद्र रेषेखालील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

तरी प्रशासकीय स्तरावर केंद्र व राज्य शासनाने तात्काळ सर्वे करून खायाला मोताज असलेल्या कुटुंबियांना जागेवर मदत देण्यात यावी तसेच भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देणे हे सर्व श्रेष्ठ कार्य असून मायबाप सरकारने या मागणीचा विचार करून आर्थिक विवंचनेतून होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला तात्काळ मदत देऊन दिलासा देण्यात यावा अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा संपर्क प्रमुख वैजनाथ गायकवाड, तालुका अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे