एलआयसीच्या खाजगीकरनाच्या विरोधात व वेतनवाढ करिता कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप

120

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.18मार्च):- गुरुवार दिनांक 18 मार्चला एलआयसी मधील सर्व श्रेनितील कर्मचाऱ्यांना देय असलेली वेतनवाढ त्वरित लागू करण्यात यावी, मोदी सरकारने एलआयसीचे खाजगीकरण करण्यासाठी उचललेले पाऊल त्वरित मागे घेण्यात यावे.

तसेच एलआयसी ऍक्ट1956 मध्ये होणारे बदल इत्यादी मागण्या साठी आल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज असोसिएशन(एआयआयइए),आलं इंडिया क्लास 1 फेडरेशन, न्याशनल फेडरेशन आफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स आफ इंडिया(एन एफ आय एफ डब्ल्यू आय),भारतीय विमा कामगार सेना,,आल इंडिया एस सी ,एसटी एलआयसी वेल्फेअर असोसिएशन या सर्व संघटना मिळून तयार झालेल्या”जॉइंट फ्रंट ” ने एक दिवशीय सम्प यशस्वी पने सम्पन्न झाला.

एलआयसी चंद्रपूर शाखा कार्यालयात एआयआयइचे चंद्र जिल्हा सचिव दीपक गोरख, एलआयसी विकास अधिकारी संघटनेचे राजकुमार जवादे , न्याशनल फेडरेशनचे शाखा सचिव राम धनमने, शाखेचे अध्यक्ष अजय चिवनडे,एलआयसी एससी एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनचे अभिजित दलाल इत्यादी पदाधिकाऱ्यानी सम्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत