आष्टी ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळे बांधकामाची उच्च स्तरीय कायदेशीर चौकशी करण्यात यावी

30

🔹श्री राहूल डांगे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आष्टी यांचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन सादर

✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(दि.20मार्च):-पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय आष्टी येथील ग्रामपंयतीने सन2019-20 या कालावधीत बांधलेले गाळे बांधकाम व दुकान गाळ्यांचे विस्तारीकरण ही कामे केलेली आहे.मात्र सदर बांधकामाचे ई-टेंडरींग सुद्धा झाले नाही व बांधकाम करण्यात आले आहे.सदर बांधकामाची माहिती अर्जदार श्री राहूल डांगे यांनी माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये जोडपत्र “अ ” नुसार माहिती मागितली असता ती माहिती मुदतीत सादर केलेली नाही त्यामुळे सदर अर्जदाराने प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांच्या कडे दाद मागण्यात आली असता सदर जनमाहिती अधिकारी यांनी माहिती न देता कार्यालयात यावे व माहिती पाहून घ्यावे असे असमाधानकारक उत्तर देऊन माहीतीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सदर अर्जदाराने अंतिम अपील मा.राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर यांच्या कडे उचित माहिती करीता सादर केली आहे.

ग्रामपंचायत आष्टी व्दारे करण्यात आलेल्या गाळे बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सत्य उजेडात येऊ शकते.सदर गाळे बांधकामाच्या उच्च स्तरीय कायदेशीर चौकशी करण्याबाबतचे निवेदन आमदार धर्मरावबाबा आत्राम अहेरी विधानसभा क्षेत्र यांना देण्यात आले असून त्यांनी सदरबाब गंभीर स्वरुपाची असुन या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.तसेच मा.नामदार हसनजी मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य ,मा .नामदार एकनाथजी शिंदे, नगर विकास मंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना उचित कार्यवाहीसाठी यांना सुद्धा निवेदन सादर करण्यात आले आहे.