प्राध्यापीकेच्या बहुचर्चित जळीतकांड प्रकरणी झाली उलटतपासणी

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.21मार्च):-प्राध्यापीकेच्या बहुचर्चित जळीतकांड प्रकरणी आज हिंगणघाट न्यायालयात पुन्हा सुनावनी झाली असून बचावपक्षाचे वकील भूपेंद्र सोने यांनी कबुली जवाब तसेच जप्तीनामा पंच असलेल्या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली.
त्याने न्यायालयासमोर सांगितलेल्या माहितीनुसार बचाव पक्षाचेवतीने उलटतपासणीमधे साक्षीदाराने विसंगत माहिती दिल्याचा दावा केला असून याचा बचाव पक्षाला उपयोग होणार असल्याचेसुद्धा सांगितले.

सदर प्रकरणी न्यायालयासमक्ष यापुर्वी १५ साक्षी तपासण्यात आल्या असून आज १६ व्या साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यात आरोपीचे वकील भूपेंद्र सोने यांनी घेतली.अभियोजन पक्षाचे वतीने शासकीय अधिवक्ता एड.दिपक वैद्य यांनी काम पाहिले.