बैंक अधिकारी व कर्मचारी यांना कोविडची लस उपलब्ध करुन द्या

21

🔹प्रमोद चीमुरकर यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.26मार्च):- मार्च 2020 पासून आजपर्यंत आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून आरोग्य विभाग, महसुल विभाग, पोलीस विभाग, ग्रामविकास विभाग व इतर संबधीत विभागातील कर्मचारी व अधिकारी यांचे सोवत देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा असलेला बँक अधिकारी व कर्मचारी लॉकडाऊन असतांना आपला जीव धोक्यात घालून शेतकरी व अन्य नागरीकांस अर्थ विषयक सोई सुविधा पुरेसे उपलब्ध करुन देण्याकरिता बँक चालू ठेवून माणुसकौचे दर्शन घडविले आहे. हे आपणास सर्वांना ठाऊक आहे. याच काळात विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी वर्क फाम होम असे काम केले. काहीनी बंद ठेवले व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारयांनी आळीपाळी काम केले.

सतत आणि प्रत्यक्ष नागरीकांच्या संपर्कात येत असल्यामूळे व पैसेचे देवाण-घेवाणींतून सहजपणे कोरोना पसरणे शक्य आहे यामूळे बँक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होवून शकतो हे नाकारता येत नाही व सामान्य नागरीकांची बँकेशी नाळ जुळली असल्यामूळे या लोकांना सुदधा कोरोनाची लागण होवू शकेल असे जिल्हा परिषद सदरय प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी पत्रदारे मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर दिले आहे. बँक अधिकारी व कर्मचारी यांना लस उपलब्ध झाल्यास संभाव्य धोका आपण टाळू शकतो. करिता चंद्रपूर जिल्हातील सर्व बैंक कर्मचारी व अधिकाऱ्यांना लस उपलब्ध करुन उपकृत करावे.अशी मागणी जी. प. सदरनीय प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केली आहे.