ब्रम्हपुरी तालूका काँग्रेस तर्फे एक दिवशीय उपोषण

28
देशातील शेतकरी यांच्या विरूद केलेल्या 3 काळया कायदयाविरुध्द व देशात डिझेल,पेट्रोल घरगुती गॅस च्या प्रचंड वाढलेल्या दरवाढीचे निषेधार्थ पक्षातर्फे एक दिवशीय उपोषण.
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.26मार्च):- भाजप प्रणीत सरकारने शेतक-यांच्या विरोधात तीन काळे कृषी कायदे केलेले आहेत. हे कायदे शेतकऱ्याला जियनातुन उठविण्याकरीता तयार केलेले आहेत अशी पक्षाची भावना आहे. या कायदयामुळे दिवसागणीत शेतकन्यांच्या आत्महत्या वाढतील. या कायदयाच्या विरोधात गेली चार महिने शेतकरी दिल्ली च्या विविध सिमेवर उपोषणाला बसलेले आहेत. एवढा प्रदिर्घ कालावधी होऊनही दिल्ली मध्ये राहणाऱ्या प्रधानमंत्री महोदयांना शेतकन्यांना भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. हे खेदाने म्हणावे लागते. उलटपक्षी हे सरकार दिल्ली मध्ये सुरू असलेले आंदोलन चिरडुन टाकण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. याचा ब्रम्हपुरी तालूका काँग्रेस कमेटी च्यावतीने निषेध करीत आहोत.
डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसच्या दरवाढीने तर महागाईचा कळसच गाठलेला आहे. 2014 पुर्वी आता असलेल्या उपरोक्त वस्तुच्या दराची तुलना केल्यास दुपटीपेक्षा दर वाढलेले आहेत हे जानवेल. 2014 पुर्वी डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅस चे दर अनुकमे रूपये 38, रूपये 48 व रूपये 400 असे होते. मार्च 2021 मे हे दर अनुकमे रू 90, रू 100 व रू 890 असे आहेत. महागाईने एवढा कळस गाठलेला आहे की सामान्य मानसाला जिवम जगणे मुस्कील झालेले आहे. शेतमजुर, शेतकरी कामगार मध्यमवर्ग यांची अयस्ता तर अंत्यत वाईट आहे.
उपरोक्त तीन कृषी काळे कायदे रदद करणे, डिझेल,पेट्रोल व घरगुती गॅस चे दर कमी करण्याकरीता झोपलेल्या केंद्र सरकारला जाग यावी म्हणुन व निषेध म्हणुन ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस, ब्रम्हपुरी शहर काँग्रेस तर्फे एक दिवशीय उपोषण मा नाम विजय वडेट्टीवार, मंत्री बहुजण कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंदपुर यांचे ब्रम्हपुरी यथील जनसंपर्क कार्यालयासमोर दिनांक 26/03/2021 रोजी उपोषणाला करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आला. यावेळी ब्रम्हपुरी तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, अँड. गोविंदराव भेंडारकर, शहर अध्यक्ष बाळु राऊत, गटनेता विलास विखार, जी. प सदरय प्रा. राजेश कांबळे, प्रमोद मोटघरे, सरपंच उमेश धोटे, जेष्ट नेते काशिनाथ खरकाटे, नेताजी मेश्राम, मोहन बागडे, नगरसेविका सुनीताताई तिडके, नगरसेविका लताताई ठाकूर, सौ. आमले, सौ. फुलझले, मोरेश्वर पत्रे, राजेश तलमले, वामन मिसार, सुरेश दर्वे, व तालुका, शहर, महिला काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.