देवळा बनावट मुद्रांक प्रकरणी आणखी एकावर गुन्हा दाखल

25

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

देवळा(दि.26मार्च):-तालुका देवळा बनावट मुद्रांक बनवून खोटे दस्त तयार करून झालेल्या शेत जमीन खरेदी प्रकरणात आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता मुद्रण कविता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली.

देवळा दुय्यम निबंधक कार्यालयात कंत्राटी पदावर संगणक चालक म्हणून काम करत असलेला बाबा पवार या व्यक्तीवर या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे देवळा पोलिसांना मिळाल्याने त्याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

त्याच्या विरोधात कलम 420 ,406 ,467 ,471 ,34 अशा विविध कलमाद्वारे देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत या गुन्ह्यांमध्ये आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत याबाबत पुढील तपास देवळा पोलिस निरीक्षक सुहास देशमुख करत आहे मुख्य सूत्रधार चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याला कळवण न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे