मास्क,सॕनिटायझर,सामाजिक अंतर ठेवा.अन्यथा कार्यवाही-सौ. पडकंठवार

27

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.2एप्रिल):- कोरोना महामारीची दुसरी लाट पसरताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.अशातच सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांना आदेश देऊन आपआपल्या जिल्ह्याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.सध्याच्या परिस्थितीत नांदेडचा एक नंबर असल्यामुळे दि.२३/३/२०२१ते दि.४/४/२०२१ पर्यंत लॉकडाऊन केले तरी पण पेशंट कमी न झाल्यामुळे हेच लॉकडाऊन आणखी दि.१५/४/२०२१ पर्यंत वाढवले आहे.सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळत असताना हणेगाव येथे अचानक सात कोरोना पेशंट आढळल्यामुळे संपूर्ण हणेगाव परिसर दणाणून गेल्यामुळे हणेगाव ग्रामपंचायतचे सरपंच सौ.वैशाली विवेक पडकंठवार यांनी हणेगाव येथे संपूर्ण परिसरात सॕनिटायझरचा फवारा चालू केला आहे.

तसेचे सर्व व्यापाऱ्यांना आदेश काढला आहे की प्रत्येकानी आपल्या दुकानात सॕनिटायझरचा वापर करणे,प्रत्येकानी मास्कचा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे व दुकानात जास्त गर्दी न करता गिऱ्हाईक करण्याचे आदेश देण्यात आले आहे.असे न आढळल्यास योग् कार्यवाही करण्याचे नोटीस बजावण्यात आले आहे.

सध्या परिस्थितीत हणेगाव ग्रामपंचायतीकडून युद्ध पातळीवर नागरिकांना आवाहन करण्याचे काम चालू आहे.यात हणेगाव ग्रामपंचायतचे सदस्य मा.विवेक पडकंठवार,उमाकांत पंचगल्ले,संदिप चेलवे,माधव नामेवार,पोलीस पाटील,शिवकांतअप्पा माळगे,अहेमद अत्तार यांनी संपूर्ण हणेगावात कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण बाजारपेठ सॕनिटायझरची फवारणी केली आहे.यासोबत कोरोनावर प्रतिबंध लावण्यासाठी सहा.पोलीस निरीक्षक अदित्य लोणीकर,बीट जमादार कणकवळे व सहकारी पोलीस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवले आहेत.