शासकीय दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील शंकरपूर येथे अवैद्य दारूचा महापूर

26

🔹महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

✒️जगदीश पेंदाम(शंकरपूर,विशेष प्रतिनिधी)मो:-8928659964

चिमूर(दि.2एप्रिल):-तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले शंकरपूर हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जात असून मागील सहा महिन्यापासून शंकरपूर व परिसरातील गावात अवैध दारू विक्रेते फोपावत असून वॉर्डा वार्डात अवैध व्यवसाय पोलिसांच्या मदतीने बिनधास्त सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. गावात व परिसरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून रात्री महिला बाहेर निघू शकत नाही इतके भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन शंकरपूर व परिसरातील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.

मागील चार वर्षे आधी शंकरपूर येथील महिलांनी दारू व्यावसायिकाच्या त्रासामुळे दारूबंदी समितीची स्थापना केली होती. आणि बऱ्याच दारू विक्रेत्यांना पकडून देत दारू विक्रेत्यावर वचक निर्माण केला होता. त्यामुळे पोलिसांचा महसूल बुडाल्याने पोलिसांनी दारूबंदी समितीच्या महिलांना सहकार्य करणे बंद केले, आता मात्र महिलांची दारूबंदी समिती नाम मात्र राहिली आणि अवैध धंद्या पासून महसूल गोळा करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला*

*मागील एक वर्ष आधी शंकरपुर पोलीस चौकी मध्ये नवीन पोलीस निरीक्षक रुजू झाले सर्व अवैध दारू विक्रेत्यांची पोलीस चौकी येथे बोलवून सभा घेतली या सभेत दारू व इतर अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करावा अन्यथा होणाऱ्या कारवाईस पात्र राहावे असा दम दिला. व दोन महिने हा कार्यक्रम राबविण्यात पण आला त्यामुळे खरोखर जिल्ह्यात दारूबंदी असल्याचे वाटत होते. व यामुळे लोकांचा सुद्धा या थानेदारावर विश्वास बसला*
*त्यानंतर लगेचच दारू विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली असून शंकरपूर येथील प्रत्येक मोहल्ल्यात घरी बियर बार सारखे टेबल लावून सोबत सर्व गोष्टीची व्यवस्था करून बिनधास्त दारू व्यवसाय करीत आहेत. सायंकाळच्या वेळेस त्या त्या मोहल्ल्यातील कोणतीही महिला एकटी बाहेर निघू शकत नाही एवढी गर्दी दारू विक्रेत्यांच्या घरासमोर असते याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आजूबाजूच्या लोकांनी काही म्हटल्यास दारू विक्रेते स्पष्ट सांगतात की आम्ही पोलिसांना महिन्याचे 20,000/- तर कोणी दारू विक्रेते 30,000/- रुपये देतो. आमचं कोणी काही करू शकत नाही तुम्हाला कुठे तक्रार करायची आहे तर बिनधास्त करा असे म्हणून नागरिकांना दम देतात. यामुळे पोलिसांचाही महसुलात जोरदार वाढ झाल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत आहेत.*

*एवढेच नाही तर दारू पिणारे पान टपरीवर , छोटे-मोठे दुकानात जाऊन गुंडागीरी करत असतात त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वाढ झालेली आहे शंकरपुर व परिसरात अवैद्य दारू विक्रीमुळे गावात भांडण व तंट्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे असून महिला व सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. आतातरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शंकरपूर व परिसरातील अवैध व्यवसाय बंद करावेत अशी मागणी शंकरपूर व परिसरातील नागरिकात जोर धरत आहे*