शिक्षकाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.3एप्रिल):-शहरातील स्थानिक पोलिस स्टेशन परीसरात असलेल्या कोटतलावात शिक्षकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 2 एप्रिलला घडली आहे.
मृत शिक्षकाचे नाव देवचंद धर्माजी मेश्राम (वय 55) रा. वाल्मिकनगर ब्रम्हपुरी असे आहे.

सविस्तर माहिती नुसार, सदर शिक्षक हा आज दि. 2 एप्रिल ला सकाळी 11 वाजता च्या सुमारास घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने शहरातील पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या कोट तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. सदर शिक्षक हा काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली येथील जिल्हा परीषदेच्या शाळेत कार्यरत होता.

माञ सध्याच्या परिस्थितीत त्यांची बदली जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या इंदिरानगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली होती.आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.मृतक शिक्षकाच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.घटनेचा प्राथमिक तपास पोलिस हवालदार अरुण पिसे करीत आहेत.