पंढरपूरात राष्ट्रवादी काॅंग्रसच्या प्रचार सभेत कोरोना गेला सुट्टीवर

30

🔹संजय मामा शिंदेचीही उपस्थिती

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.5एप्रिल):-भारतनाना भालकेंच अचानक झालेल्या निधनामुळे पंढरपुर तालुक्याची पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवतडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्राधूर्भाव पूर्ण महाराष्ट्रात पसरताना दिसत आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात वाढत चालले आहेत.

एकीकडे महाविकास आघाडी सरकार सांगत आहे की गर्दी करू नका, नियमांचे पालन करा. मात्र राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना केराची टोपली दाखविली आहे. पंढरपूर तालुक्यातील निवडणूक लागली म्हणजे तेथील कोरोना रजेवर तर नाही ना गेला? असा संतप्त सवाल सध्या व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेला हजारो लोकांनी गर्दी केली होती. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर या सभेत करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे दिसत आहेत. त्यांनी देखील मास्क घातलेलं नाही. कोरोना फक्त सर्व सामान्य जनतेसाठी आहे का?असा सवाल सध्या उठविला जात आहे.

करोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्यावर मुलीचे / मुलाचे लग्न करण्यासाठी अनेक गरीब माय बापानी कष्ट करून पैसे साठविले आहेत. मात्र शासनाने दिलेल्या आदेशामुळे आणि संसर्ग पसरू नये यासाठी त्यांनी देखील धीर धरला आहे. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या या गर्दीत कोरोना चिरडून तर मला नसेल ना? अशी शंका मनामध्ये व्यक्त होत आहे.