🔹बाळापुर (बुज.) व मौशी या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात आता कोविद लसीकरणाची सोय

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.5एप्रिल):-कोविद चे वाढते रुग्ण लक्षात घेता आता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात मात्र अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय नसल्याने नागरिकांची अडचणी येत होत्या. नजिकच्या केंद्रावर लसीकरणाची सोय करण्याची मागणी लक्षात घेता चंद्रपूर जिल्हा प्रशासन व जि.प.आरोग्य विभागाने आता सर्वच आरोग्य केंद्रात कोविद लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.

आज नागभीड तालुक्यातील बाळापुर (बुज.) व मौशी या दोन्ही केंद्रात लसीकरणाची सुरुवात जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी नागभीड पं.स.सभापती प्रफुल्ल खापर्डे, उपसभापती सौ.रागिणीताई गुरपुडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांची विशेष उपस्थिती होती. तालुक्यात यापूर्वी ग्रामीण रुग्णालय,नागभीड व नवेगाव पांडव , तळोधी बाळापुर , वाढोणा या चारच ठिकाणी लसीकरण होत असल्याने असल्याने अडचण येत होती.

मौशी केंद्रात नागभीड पं.स.च्या उपसभापती सौ.रागिणीताई गुरपुडे तर बाळापुर (बुज.) केंद्रात माजी सरपंच व भाजपा नेते धनराजजी बावणकर यांनी सर्वप्रथम कोविद लस घेतली. त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. आज पहिल्याच दिवशी बाळापुर येथे ८७ तर मौशी येथे ८१ जणांचे लसीकरण करण्यात आले. बाळापुर येथे डॉ. विजय हिवरकर व डॉ. स्वाती भोगावार तर मौशी येथे डॉ. सागर माकडे व डॉ. दिनेश अथेलकर या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण केंद्र सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरु राहणार आहे.

तालुक्यातील ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांनी कुठलीही भिती न बाळगता कोविद लसीकरण करुन आपले आरोग्य सुरक्षित करुन घेण्याचे आवाहन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी याप्रसंगी केले व नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी लवकरच तालुक्यात मोहाळी , गोविंदपुर , गिरगाव, नांदेड येथे केंद्र सुरु करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करणार असल्याची माहिती दिली. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्व:ताच्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी राज्य व आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचीही विनंती केली.

लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बाळापुर येथे सरपंच प्रशांत कामडी , धनराज बावणकर , डॉ. मदन अवघडे , रमेश फुलझेले ,भोजराज नवघडे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक मारोती चन्ने , सिएचओ डॉ. गेडाम तर मौशी येथे सरपंच सौ.संगिता करकाडे , माजी सरपंच वामनराव तलमले , अरविंद भुते, विकास मानापुरे, सिएचओ डॉ. प्रियंका पिसे व डॉ. सावटे मँडम यांच्यासह सर्व आरोग्य सेवक, कर्मचारी , आशा सेविका यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED