समन्वयातून वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करा- उप विभागीय अधिकारी क्रांति डोंबे

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.4एप्रिल):- दि. 4/4/2021 वन हक्क कायदा 2006 ची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व वन विभागाने समन्वयातून वन हक्क व्यवस्थापन व कायद्याची अमलबजावणी कारावी असे आव्हान उपविभागीय अधिकारी क्रांति डोंबे यांनी केले. ते उपविभागीय अधिकारी (राजस्व) कार्यालय ब्रम्हपुरी येथे पार पडलेल्या सभेत विचार व्यक्त केले. सविस्तर असे की, अक्षयसेवा संस्था यान्चे पुढाकारातून वन हक्क कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची सभा अध्यक्ष उपविभागीय वन हक्क समिती यांचे कार्यालयात पार पडली.

सभेत वन हक्क व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी वन विभागाचे सहकार्य, कायद्यातील कलम 3(1) ग नुसार ग्रामसभे मार्फत तेंदू पत्ता लिलाव व विक्री करणे, वन धन योजना, समिती सदस्य व संबंधित यंत्रणा यान्चे एक दिवसाचे प्रशिक्षण आदिवासी विकास प्रकल्प विभाग चिमूर पुढाकारातून घेणे, अवैध वृक्ष तोड थांबविण्यासाठी सामुहिक प्रयत्न, तथा सीएफआर प्राप्त गावांमधे वृक्ष लागवड करणे, वन उपजावर आधारित प्रक्रिया उद्योग व शाश्वत उपजीविका निर्माण करणे, वन उपजत गोळा करताना काही वन्य प्राण्यांकडुन इजा झाल्यास वन विभागा कडुन नुकसान भरपाई, आदि बाबीवर चर्चा झाली व निर्णयही घेण्यात आले.

सभेला उपविभागीय वन हक्क समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी (राजस्व) क्रांति डोंबे, साहाय्यक उप वन संरक्षक रामेश्वरी बोन्गाळे ब्रम्हपुरी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी बावनकर साहेब चिमूर, वन परिक्षेत्र अधिकारी (उत्तर )पुनम ब्राम्हने ब्रम्हपुरी, अक्षयसेवा संस्थेचे सचिव सुधाकर महाडोरे, ग्रामसभा महासंघ अध्यक्ष सुषमा मोहुर्ले तालुका वन हक्क कायदा समन्वयक सागर साबळे हे उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.

सभेला रनवीर ठाकरे गणेशपुर, गुरुदेव सेवा मंडळाचे रवि पवार, अतुल राऊत तुळशीराम काटलाम वायगाव सचिव राजेश पारधी तथा कळमगाव, चीचखेडा, अड्याळ, लाखापुर, मालडोंगरी, दुधवाही, जवराबोडि मेंढा व आदि एकुण 12 गावातील सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.