केम गावाचा आदर्श प्रत्येक गावातील जनतेने घ्यावा

30

✒️नागेश खूपसे( सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.5एप्रिल):-करमाळा तालुक्यातील केम या गावामध्ये कोरोना महामारी आजारापासून बचाव करण्यासाठी केम ग्रामपंचायतीने विना मास्क गावांमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही असा उपक्रम केम ग्रामपंचायत राबवत आहे दिवसेंदिवस कोरोना पेशंट ची वाढ लक्षात घेता हे नियोजन करण्यात आले असल्याचे मराठी शाळेचे शिक्षक अय्युब मोमिन यांनी सांगितले केम या गावामध्ये आजुबाजुच्या गावातील लोकांना तोंडाला मास्क नसल्यास गावांमध्ये प्रवेश दिला जात नाही.

जर या कोरोना रोगापासून आपलेला वाचायचे असेल तर मास्क वापरणे जरुरीचे आहे सोशल डिस्टंस ठेवणे हात वारंवार धुणे गरजेचे आहे असे मत दोंडवस्ती केम शाळेचे शिक्षक नंदकुमार तळेकर यांनी सांगितले खरोखरच केम या गावाचा आदर्श सर्वांनी जर घेतला तर नक्कीच आपण या रोगापासून वाचु शकतो मास्क वापरुन सोशल डिस्टंस ठेऊन हात वारंवार धुऊन आपली व आपल्या परिवाराची काळजी घेतली तर आपलेला या महामारी आजारापासून वाचण्यासाठी मदत होईल असे केम गावचे युवा नेते संपत जाधव यांनी सांगितले.

आज सकाळी उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी केम गावामध्ये कोरोना महामारी आजाराविषयी गावामध्ये कसे कडेकोट बंदोबस्त करताहेत जणता नियमांचे पालन करते का नाही हे जाणून घेण्यासाठी केम मराठी शाळेचे शिक्षक अय्युब मोमिन नंदकुमार तळेकर यांची भेट घेतली असुन आपण पण उपळवटे गावामध्ये केम गावाचा आदर्श घेऊन नियोजन नक्की चं करणार असल्याचे संदिप घोरपडे यांनी सांगितले.

यावेळी अनिल यादव ( मतीमंद शाळा केम )
रामचंद्र पाटील ( मतीमंद शाळा केम )संपत जाधव भाऊसाहेब कंगळे गुरुजी केम भारत कोरडे विष्णू दोंड रामदास कांबळे अय्युब मोमिन शिक्षक खानटवस्ती केम नंदकुमार तळेकर शिक्षक दोंडवस्ती संदिप घोरपडे उपळवटे आदि मान्यवर उपस्थित होते