ब्रम्हपुरी तालुक्यात कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यावर होत असलेल्या अन्याय दूर करा

26

🔸निवेदन कर्ते सर्व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO ) ब्रम्हपुरी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.7एप्रिल):-ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये (उपकेंद्रामध्ये) आम्ही समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत असून ब्रम्हपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्णांना अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करत आहोत. कोविड साथीच्या काळात आम्ही रुग्ण तपासणी, रुग्ण विलगीकरण, जिल्हा सिमेवर प्रवाशांची कोविड तपासणी, पुरग्रस्त भागात जाऊन आरोग्य सेवा पुरविणे, कोविड केंद्रातील कामे, कोविड लसीकरण इत्यादी अनेक आघाड्यांवर कार्य करुन अहोरात्र व अथक सेवा दिली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीनूसार आम्हाला दरमहा रु. 15000 /- (पंधरा हजार रुपये) प्रोत्साहनपर भता देय असतो. सदर भता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांना पूर्णपणे प्राप्त होत असतो. परंतु केवळ ब्रम्हपूरी तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकार्यांना त्यातील अत्यल्प रक्कम अदा करण्यात येत आहे. सदर बाब आम्ही संबंधित स्यानिक आरोग्य अधिकान्यांच्या निदर्शनास वारंवार आणून दिली. परंतु त्यांचेकडून नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच आमच्या कार्याचे मुल्यमापन अयोग्य पद्धतीने होवून नकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे जात आहे.

यामुळे आम्हा सर्वांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे व आम्ही हतबल झालेलो आहोत.सदर प्रकरणात लक्ष घालून आम्हाला आमच्या हक्काचा मोबदला प्राप्त करुन देऊन न्याय द्यावा.अशी मागणी राज्याचे मदत वर पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालक मंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.