अॅड प्रभाकर ज्ञानोबा लहाने यांचे दुःखद निधन

28

✒️अहमदपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदपूर(दि.8एप्रिल):- माकेगाव तालुका रेणापूर येथील अॅड प्रभाकर ज्ञानोबा लहाने यांचे पूणे येथे कोरोना मुळे दुःखद निधन झाले आहे.अॅड प्रभाकर ज्ञानोबा लहाने यांचे.वयाच्या 62 व्या वर्षी यांचे कोरोना मुळे निधन झाले.अॅड प्रभाकर लहाने यांनी लातूर जिल्ह्यात व अहमदपूर परिसरात एक चांगलाच ठसा निर्माण केला होता.व मुंबई येथे स्थायिक होऊन ठाणे येथील कोर्टात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत होते.

या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीबांच्या मुला मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थी शिक्षणाकडे कसा वळेल याकडे लक्ष देत असे.सामाजिक चळवळीत एक चांगला ठसा उमटविला होता.दु:खद निधनाने जिल्ह्यांत व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचा पश्चात दोन मुले आहेत.एक सुनिल हे हायकोर्ट मुंबई येथे प्रॅक्टिस करतात व दुसरा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बहिण,पत्नी, एक मुलगी- जावंई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.