गंगाखेडसाठीच्या संरक्षीत बंघाऱ्यात जलपूजन

28

🔸कार्यकर्ते, प्रशासनाचे मानले आभार

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9एप्रिल):-शहरवासीयांसह परिसरातील पशु-पक्षांसाठी पीण्याचे पाणी सुरक्षीत करण्यात आलेल्या गोदापात्रातील कच्च्या बंधाऱ्यात आज जलपूजन करण्यात आले. यासाठी झटणारे कार्यकर्ते आणि प्रशासनाचे आभार मानत या पाणीसाठ्यातून आगामी ऊन्हाळ्याच्या काळात शहरवासीयांची तहान भागवली जाईल, असा विश्वास यावेळी ऊपस्थित सामाजीक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

गंगाखेडच्या कच्च्या बंधाऱ्यातील पाणी पळवले जावून शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय अशी भिती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली होती. काही जागरूक नागरिकांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्याकडे यासंदर्भाने आवाज ऊठवण्याची मागणी केली. यावरून गोविंद यादव यांनी तक्रार केल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या. पोलीस बंदोबस्त तैनात करून येथे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. ऊन्हाळ्यात हे पाणी सुरक्षीत राहण्याची खात्री पटली असून यावरून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आज या जलसाठ्याचे सामाजीक कार्यकर्त्यांच्या वतीने विधीवत जलपूजन करण्यात आले. युवानेते सुशांत चौधरी यांच्या हस्ते आणि तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव, नगर परिषदेचे गटनेते गोविंद ओझा, नगर परिषद सदस्य बाळासाहेब राखे, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे, बजरंग दलाचे संजयलाला अनावडे, ग्राहक पंचायतचे सुधाकरमामा चव्हाण, हाजी शेख गफारभाई, प्रदीप चौधरी आदिंची यावेळी ऊपस्थिती होती. गजानन जोशी यांनी पौराहित्य केले. कोरोना साथीच्या पार्शभूमीवर कमी ऊपस्थितीत आणि योग्य ती खबरदारी घेत हे जलपुजन करण्यात आले. पाणी सुरक्षीत ठेवल्याबद्दल कार्यकर्ते आणि प्रशासनाचे आभार मानण्यात आले. तर, भविष्यात हे पाणी पळवण्याचा प्रयत्न झाल्यास मोठे जनआंदोलन ऊभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.