केंद्र सरकार आणि मोदींचे कोरोना लसीवरून घाणेरडं राजकारण : मो. कादर शेख (सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.9एप्रिल):-महाराष्ट्रात भाजप सरकार नाही याचा राग केंद्रसरकार व मोदी महाराष्ट्रातील लोकांवर काढत आहे,आणि लोकांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव मो.कादर शेख यांनी केला आहे.
कोरोना काळात या ना त्या कारणाने महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र भाजप रचत आली आणि प्रत्येक वेळी त्यामध्ये तोंडावर आपटली, आता तर भाजप ने लोकांच्या जीवाशी खेळ सुरू केले आहेत.आज आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राने देशात सर्वात जास्त लसीचे डोस त्यांच्या नागरिकांना दिले आहेत, आणि आजच्या घडीला महाराष्ट्राकडे फक्त 3 दिवस पुरतील एवढेच डोस आहेत.

याबाबत महाराष्ट्र सरकार मागील कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करत आहे, पण केंद्राकडून महाराष्ट्राला अजून ही लसी मिळालेल्या नाहीत आणि कदाचित त्या 15 तारखेनंतरच मिळतील, म्हणजे जर लसी मिकाल्या नाहीत तर 10 तारखेनंतर महाराष्ट्रातील लसीकरण बंद होण्याची शक्यता आहे.या आधी सुद्धा मुंबई महापालिकेने लोकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारकडे घरोघरी जाऊन लस देण्याची परवानगी मागितली होती ,पण केंद्राने ती मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केंद्राकडे 25 वर्षांवरील सर्वांसाठी लस देण्याची परवानगी मागीतली होती, ती मागणी सुद्धा मोदी सरकारने फेटाळून लावली.

एकूणच काय तर महाराष्ट्रात भाजप सरकार नाही याचा राग केंद्र सरकार व मोदी महाराष्ट्रातील लोकांवर काढत आहे, आणि लोकांच्या जीवाशी खेळत आहे. युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव मोहम्मद कादर शेख यांनी म्हटलं कोरोनाव्हायरस ‘उत्सव’ नव्हे तर वाढत्या कोरोना संकटात लसीचा अभाव ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. आपल्या देशातील नागरिकांचा जीव धोक्यात घालून लस निर्यात योग्य आहे का?केंद्र सरकारने पक्षपात न करता सर्व राज्यांना मदत केली पाहिजे. आपल्या सर्वांना एकत्रितपणे या विषाणूचा पराभव करायचा आहे.