तलवाडा पोलीस ठाणे हाद्दितील गोदाकाठ वाळु तस्करीचा अड्डा!

36

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.11एप्रिल):-एके काळी गंगेचे पाणी अमृत समजल्या जायचे या ठिकाणी पापी आपले पाप धुन्यासाठी अर्वजुन उपस्थिति दर्शवीत होते. परंतु हाल्लीच्या काही महाभागांनी आपली शेंबडी नाक बुडवत या पवीत्र जलाशयातुन पापीकृत्य अवलंबत वाळु तस्करीचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात सुरु करुन गोदाकाठ वाळु तस्करीचा अड्डा बनवल्याचे प्रतेकदर्शी दिसुन येत आहे. जे हारामखोरांनी गोदाकाठ च्या पवित्र ठिकाणी वाळु तस्करीचा ऊच्छांड मांडला त्या गोदाकाठची रक्षणाची जबाबदारी ज्या महसुल प्रशासनाच्या आख्त्यारिच्या माध्यमातुन स्थानीय पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन आसते त्याच अधिकारी व पदाधिकारींच्या वर कमाईच्या नादानं वाळु तस्करांचे मनोबल दिवसेंदिवस वाढतांना दिसुन येत असुन तलवाडा पोलीस स्टेशनच्या समोरुन राजरोसपणे अवैध वाळुची वाहतुक होते.

कशी ह्या वर संशोधनीक शोधा अंती या वाळु तस्करीच्या व्यावसायिक धंद्याला शासन प्रणालीतील प्रशासकिय साखळी कारणीभुत आसल्याचे एकंदरित चित्र समोर येत असुन तलवाडा पासुन बीडच्या मुख्यालया पर्यंत अवैध धंद्यावाल्यांची साखळी देशाच्या चौथ्या स्थंभातील कार्यरत प्रतिनिधिनसाठी जिवघेणी ठरु पाहत आहे. तलवाडा पोलीस ठाण्याच्या हाद्दितील गोदाकाठच्या पट्यात वाळु तस्करीचा अड्डा ठिक ठिकाणी दिसुन येत आहे आज दिं. ११/४/२०२१ रोजी आमच्या प्रतिनिधिंनी प्रतेक्ष गोदाकाठच्या पट्याची पाहणी केली असता या ठिकाणी केणीच्या सहायतेने मोठ्या प्रमाणात वाळु ऊपसा व वाहतुक होतांना दिसुन आली गेवराई तहसील व तलवाडा पोलीसांसह बीड जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रशासन सबब बाबीला जबाबदार आसल्याचे गोदाकाठच्या नागरिकातुन बोलल्या जात आहे.
===============
तलवाडा पोलीस स्टेशनच्या हाद्दितील गोदाकाठ परिसरात मिडिया व वृतपत्राच्या प्रतिनिधिंना वृत संकलन करण्यास गेले आसता समक्ष समोरा समोर वाळु तस्करांकडुन धमक्या देण्यात आल्या.