राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

36

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.11एप्रिल):- सावता माळी समाज सुधारणा मंडळ धरणगाव , महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य , संत सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..
याप्रसंगी धरणगांव नगरीचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ , उषाताई वाघ, अंजलीताई विसावे, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबादादा महाजन, निंबाजी महाजन, लहान माळीवाडा चे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

याप्रसंगी कैलास माळी,विजयभाऊ महाजन, विलास महाजन, सुखदेव महाजन, दशरथ महाजन, गजानन महाजन , निलेश महाजन, नितेश महाजन, महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेश संपर्कप्रमुख डॉ धनराज देवरे, महात्मा फुले ब्रिगेड जळगाव जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी मनोज महाजन, महात्मा फुले ब्रिगेड तालुका अध्यक्ष नरेंद्र महाजन, सावता माळी युवक संघाचे तालुका अध्यक्ष निलेश महाजन , ललीत पाटील व धरणगाव शहरातील समस्त बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. टी. माळी यांनी केले तर आभार हेमंत माळी यांनी मानले.कांतीलाल महाजन, कैलास महाजन यांनी सहकार्य केले.