चंद्रपूर जिल्ह्यात (दि.13एप्रिल) रोजी 24 तासात 335 कोरोनामुक्त 1010 कोरोना पॉझिटिव्ह – 14कोरोना बधितांचा मृत्यू

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.13एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 335 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1010 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली अ qe queसून 14 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 35 हजार 513 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 28 हजार 448 झाली आहे. सध्या 6549 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 8 हजार 868 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 67 हजार 727 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या छत्रपती नगर तुकुम येथील 56 वर्षीय महिला, घुटकाला वार्ड येथील 65 वर्षीय महिला, ऊर्जानगर येथील 75 वर्षीय पुरुष, दादमहल वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष व पाण्याच्या टाकीजवळ राम नगर येथील 48 वर्षीय पुरुष, कोरिनाल तालुका चिमूर येथील 56 वर्षीय पुरुष, चिमूर शहरातील 65 वर्षीय पुरुष, राजुरा येथील 53 वर्षीय पुरुष, राजोली ता. मूल येथील 72 वर्षे पुरुष, वणी यवतमाळ येथील 69 वर्षीय पुरुष, राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपूर येथील 60 वर्षीय महिला, मूल येथील 75 वर्षीय पुरुष, लोधिखेडा, वरोरा येथील 70 वर्षीय महिला, चिमूर येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 516 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 471, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 20, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1010 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 362, चंद्रपूर तालुका 112, बल्लारपूर 110, भद्रावती 32, ब्रम्हपुरी 81, नागभिड 38, सिंदेवाही 29, मूल 23, सावली 29, पोंभुर्णा चार, गोंडपिपरी 12, राजूरा 54, चिमूर 54, वरोरा 39, कोरपना 10 व इतर ठिकाणच्या 21 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 20 मृत्यूसह आज(13 एप्रिल) 370 नवीन कोरोना बाधित तर 108 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.13: वीस मृत्यूसह आज जिल्हयात 370 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 108 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 12952 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10854 वर पोहचली. तसेच सद्या 1911 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 157 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 20 नवीन मृत्यूमध्ये 64 वर्षीय महिला गोकूलनगर गडचिरोली, 65 वर्षीय पुरुष जि. चंद्रपूर, 65 वर्षीय पुरुष चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 78 वर्षीय महिला कलेक्टर कॉलनी गडचिरोली, 52 वर्षीय पुरुष आरमोरी जि.गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष विसोरा ता.वडसा जि.गडचिरोली, 40 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 27 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 57 वर्षीय महिला वडसा जि.गडचिरोली, 53 वर्षीय पुरुष विहिरगाव ता.वडसा जि.गडचिरोली, 55 वर्षीय महिला जि.यवतमाळ, 50 वर्षीय पुरुष जि.नागपूर, 55 वर्षीय महिला जि.गडचिरोली, 60 वर्षीय महिला जि.भंडारा, 57 वर्षीय पुरुष ऐकलापूर ता.वडसा जि.गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष कुरखेडा जि.गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर, 62 वर्षीय पुरुष नवेगाव कॉम्पलेक्स गडचिरोली असे महिला व पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.80 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.99 टक्के तर मृत्यू दर 1.21 टक्के झाला.

नवीन 370 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 150, अहेरी तालुक्यातील 23, आरमोरी 20, भामरागड तालुक्यातील 19, चामोर्शी तालुक्यातील 20, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 11, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 21, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 5, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 35 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 30 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 108 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 44, अहेरी 10, आरमोरी 2,मुलचेरा 1 ,भामरागड 20, चामोर्शी 8, धानोरा 1, एटापल्ली 0, सिरोंचा 3 ,कोरची 2 ,कुरखेडा 03 तसेच वडसा 14 येथील जणाचा समावेश आहे.