नेरी येथील छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थीनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अव्वल

42

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.14एप्रिल):- येथे पोलीस व आर्मी चे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या विध्यार्थिनी वरोरा येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय कुंग-फु-कराटे स्पर्धेत अव्वल ठरल्या आहेत. छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र नेरी येथील जागृती मरस्कोल्हे हिने ७० वजन गटात रौप्य तर कल्याणी मनघाटे हिने ४७ वजन गटात कास्य पदक पटकावले आहे.

वरोरा येथे कुंग-फु-डो फेडरेशन ऑफ इंडिया ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विविध राज्यातील ३०० च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला होता. ग्रामीण भागातून प्रशिक्षण घेवून राष्ट्रीय स्तरावर अव्वल आल्यामुळे जागृती व कल्याणी यांचे विशेष कौतुक स्पर्धेचे आयोजक श्री प्रवीण रामटेके यांनी केले.

आपल्या यशाचे श्रेय छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रवर्तक डॉ. अजय पिसे, संचालक सुशांत इंदोरकर, सहसंचालक विशाल इंदोरकर, प्रशिक्षक पिपलायन आष्टनकर व आपल्या आई-वडिलांना दिले. परिसरातील सर्व घटकांकडून अव्वल ठरलेल्या विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे.