घर तिथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या अभियानाचे उद्घाटन संपन्न

30

🔹नगराध्यक्षा अलका स्वामी व आमदार प्रकाश आव्हाडे यांची उपस्थिती

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.14एप्रिल):-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ऐतिहासिक व सैद्धांतिक ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे घरोघरी वाचन वाढवण्यासाठी ‘घर तेथे बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रावस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभियानाचे उद्घाटन इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. अलका स्वामी आणि इचलकरंजी मतदार संघातील आमदार प्रकाशजी आव्हाडे यांच्या हस्ते ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे अनावरण करून संपन्न झाले.

14 एप्रिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून इचलकरंजी मध्ये या अभियानाच्या उदघाटनाचा समारंभ सामाजिक कार्यकर्ते आणि इचलकरंजीचे नगरसेवक अब्राह्ममजी आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या या उद्घाटन प्रसंगी मा. अलका स्वामी यांनी घराघरात बुद्ध आणि त्यांचा धम्म पोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केली. आमदार प्रकाशजी आवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले कोणतीही पुस्तक वाचूनच आपण त्यांना अभिवादन केले पाहिजे.

अशी भूमिका मांडली. युवा नेते राहुल आवळे यांनी युवकांमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जाण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून घराघरांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे मत व्यक्त केले. या उद्घाटन समारंभास उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भदंत आर. आनंद, अनिल म्हमाने प्रा. करुणा मिणचेकर, डॉ. अमर कांबळे, विश्वजित कांबळे, गजानन शिरगावे, अभिजित घोरपडे, विजय कंबळे यांच्यासह इचलकरंजीतील मान्यवर उपस्थित होते.