मलकापूर येथे वंचित आघाडी व बौध्द महासभेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन

27

✒️मलकापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मलकापूर(दि.15एप्रिल):-भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती मलकापूर येथे वंचित बहुजन व आघाडी भारतीय बौद्ध महासभा वतीने साजरी करण्यात आलीयाप्रसंगी स्थानिक रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष एस.एस. वले सर, वंचित बहुजन आघाडीचे अतिशभाई खराटे बुलढाणा जिल्हा महासचिव, तुळशीराम वाघ जिल्हा सचिव, सुशीलभाऊ मोरे तालुकाध्यक्ष, राजू शेगोकार तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, शेख यासीन कुरेशी शहराध्यक्ष, संजय दाभाडे तालुका नेते, बाळू सावळे, विलास तायडे,विजय झनके,गणेश सावळे, गजानन झनके, प्रवीण के.इंगळे,सुनील अहिरे आदी उपस्थित होते