पिवळे शिधापत्रिका धारकांना खासगी हॉस्पिटल येथे कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी सवलत द्यावी

32

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

नवापूर(दि.17एप्रिल):-महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहिर केले होते. त्यानुसार देशातील सर्व कामेधंदे बंद पडले होते. तसेच आता महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हात कोविड १९ ची दुसरी लाट ने गोर गरीब लोकांचे बळी घेतले आहे. म्हणून महाराष्ट्र राज्यातील गोर गरीब लोक आपल्या व आपले कुटुंबाचे जीव जसे तसे उदरनिर्वाह करीत आहे. तसेच कुटुंबातील करता-हरता माणसाला कोरोना ची लागण झाली को परिवार पुर्णपणे रोडावर येऊन जातो. तसे त्यांच्याकडे खासगी हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी पैसे राहत नाही.

पैसे नसल्यामुळे तो व्यक्ती खासगी हॉस्पिटल येथे कोरोनावर वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाही. कारण की खासगी दवाखान्यात डॉक्टर २ ते ३ लाख रुपये बिल एका पेशंटवर काढत आहे. गोर गरीब लोक खासगी हॉस्पिटलाचे बिल भरु शकत नाही. तसेच महाराष्ट्र राज्यातील सरकारी दवाखान्यात आजपर्यंत परत कोणत्याही प्रकाराची पुर्ण व्यवस्था सरकार कडून करण्यात येत नाही.

गोर गरीब लोकांना कोरोनावर मात करण्यासाठी खासगी हॉस्पिटल शिवाय पराय नाही. कोरोना पेशंट सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्यावर सरकारी डॉक्टर कडुन फक्त विटामिन चा गोळ्या दिल्या जातात. दुसरा कोणत्याही प्रकारचा उपचार सरकारी दवाखान्यात होताना दिसत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व पिवळे शिधापत्रिका धारकांना खासगी हॉस्पिटल येथे कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी शासनाने खासगी हॉस्पिटल यांना तसे आदेश द्यावे. जेणे करुन गोर गरीब लोकांचे जीव वाचु शकेल.