डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या विरोधकावर गुन्हा दाखल

✒️वडणेर/हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हिंगणघाट(दि.17एप्रिल):- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला विरोध करणाऱ्या सचिन उरकुडे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निवेदन डी वाय एस पी कदम यांना इंजि निखिल कांबळे बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आले.14 एप्रिल 2021 ला संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना वडनेर पोलिस हद्दीतील काचन गावातील सचिन उरकुडे ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल फेसबुकवर अभद्र व अवमानकारक पोस्ट शेयर केली, ज्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असता सुनील ढोरे, निखिल कांबळे, रवी कांबळे यांनी वडनेर ठाणा गाठून तात्काळ कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिक्षक दिनेश कदम, ठाणेदार राजेंद्र शेटे यांना देण्यात आले.

अधीक्षक कदम यांच्या आदेशानुसार सचिन उरकुडे वर भांदवी कलम 153अ नुसार गुन्हा दाखल झाला.यावेळी ऍड. वीरेंद्र कांबळे, विवेक नाखले, सुरज ताकसांडे, प्रदीप भोंगाडे, सचिन कुंभारे, कपिल गोटे, सरपंच वडनेर, मधुकर कुंभारे, शामराव कुंभारे, भीमराव गोटे, सुमेध ढोरे, अभय ब्राह्मणे, अजित बुरबुरे, छोटू गोटे, प्रफुल पाटील, चंद्रमणी गोटे, रजत सोगे, प्रभाकर नाईक, मनोज कांबळे, निखिल जूनगडे, रवी कांबळे रोशन नगराळे येरणगाव इत्यादी गावातील मंडळी उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED