लॉकडाऊन ची भिती, अजून जिव घेणार तरी कीती?

25

कोरोना ही फेक महामारी आहे याची जाणीव नागरिकांना होत आहे. सरकार कोरोना विषयी एवढे कठोर निर्णय का घेते हेच कळत नाही. लॉकडाऊन ने कोरोना नियंत्रणात येतो हे सरकारला नेमके सांगितले कोणी? देशातील नागरिकांना जागृत होणे आज आवश्यक झाले आहे. कारण मागच्या वर्षी कोरोनाच्या नावाखाली कडक लॉकडाऊन करून करोडो लोकांचा रोजगार हिरावून घेतला, करोडो लोकांना पायाला उन्हाचे आणि पोटाला भाकरीचे चटके देऊन जिवन नकोसे केले. पोटाच्या चटक्या पेक्षा उन्हाचे आणि कोरोनाचे चटके घ्यायला लोक तयार आहेत कारण कोरोनाने लोक मरत नाही हे निश्चित झाले. फेक महामारीच्या नावाखाली लोकांचे जिवन छिन्नविच्छिन्न करण्याचा कार्यक्रम सरकारने सुरू केलेला आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन करून कोरोनाचे रुग्ण लाखोच्या संख्येने वाढले असताना, या वेळी लॉकडाऊन केल्याने कोरोना नियंत्रणात येतो म्हणणारे नेमका आधार तरी कशाचा घेतात? कोरोनाचा खेळ लक्षात घेणे गरजेचे आहे.

आपण आज दाखवल्या जाणाऱ्या भयानक बाबीवर कधीच विचार करत नाही, वाचन आणि चिकित्सा नसल्याने आम्ही घरातील टीव्ही सांगेल त्यावर विश्वास ठेवतो. आपल्या आजूबाजूला अनेक रूग्ण असे आहेत की जे सहा महीने आठ महिने एका वर्षांपासून आजारी आहेत, त्यांचा बाहेर जास्त वावर सुद्धा नाही, तरी अशालोकांचा मृत्यू होतो तेव्हा कोवीड ने मृत्यू झाला असे सांगण्यात येते. आपण कोवीड चा विचार केला तर कोवीड हा संसर्गाने होणारा आजार आहे, जर संसर्गाने होणारा आजार असेल आणि एक रुग्ण सहा आठ महिन्यापासून एकाच जागेवर बसलेला असेल किंवा बाहेर जास्त वावर नसेल आणि त्याला कोरोना ची लागन झाली तर याचा अर्थ घरातील कोणत्या तरी व्यवक्तीच्या माध्यमातून बाहेरचा कोरोना घरात आला. मग जो कोरोना वाहक आहे तो आणि घरातील रुग्ण यांची तरी किमान कोरोना चाचणी सकारात्मक यायला पाहिजे. पण तसेही होत नाही, कोरोना असा आजार आहे, संपर्कात आल्यावर कोरोना होतो पण होम कोरंटाईन असल्यास ईतरांना कोरोना होत नाही.

जगातील एकमेव महामारी अशी आहे की दिलेली औषधी फेकून जरी दिली तरी ठरलेल्या दिवसात कोरोना चाचणी निगेटिव्ह येते. कोरोना महामारी आहे, त्यावर कोणते औषधी नाही, मग फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने कोविड बरा होतो. खरं बघितलं तर कोरोना विषयी खुप गमतीशीर मुद्दे आहेत त्यापैकी काही मुद्दे लोकांना पटतात काहीना आपलेच खरं आहे अस वाटतं. गर्दी द्वारे कोरोना पसरतो अशी अफवा पसरवणारे हजारोंच्या सभा घेतात तेव्हा कोरोना होत नाही, निवडणूक ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी कोविड चे रुग्ण आठळत नाहीत. कोरोना ला महामारी म्हणणारे महामारीला बाजूला करून निवडणूकीचा जल्लोष करतात तेव्हा कोरोना होत नाही, सर्व सामान्य लोकांना काम करून पोट भरावे लागते, लोकांच्या पोटाला उपाशी ठेवून त्यावर बंधने घातली जातात पण निवडणूक आसली की सर्व काही सुरळीत असतात. मरकज मध्ये कोवीड रुग्ण सापलेले असताना संपूर्ण समाजाला खालच्या स्तरावर जाऊन बोलणारे लोक कुभंमेळ्यातील गर्दी व कोरोनावर एकही शब्द बोलत नाहीत.

आपण जर दर वर्षीचा मृत्यू दर बघितला तर मार्च नंतर प्रत्येक मृत्यू हा कोविड मुळे झाल्याचे सांगितले जात आहे. उस्मानाबाद सारख्या ठिकाणीचे पितळ उघडे पडले म्हणून आकडे समोर आले, सात लोकांचा मृत्यू झालेला असताना २७ लोकांचा मृत्यू दाखवून सरकार नेमके काय सिद्ध करणार आहे. लोकांच्या मनात भिती ? की आकडे जास्त दाखवून निधिचा भ्रष्टाचार? कोरोना नेमका कोणाला होतो? कसा पसरतो याचे सगळे नियम तोडून घरात बसलेल्या ला कोरोना होतो, कामावर पोठभरण्यासाठी गेले तर करोना होतो, पण निवडणूक असताना प्रचारामध्ये आणि सभेमध्ये कोरोना होत नाही याचे गमक अजूनही कळाले नाही. कोरोना महामारी आहे, कोरोना ने देशाचे आणि जनतेचे अतोनात नुकसान केले आहे, कोविड ने मुलाचे जिवन उद्ध्वस्त केले आहे, परिक्षा बंद, काम बंद, छोटे व्यवसाय बंद बाहेर फिरने बंद असताना निवडणूक बंद होऊ शकत नाही म्हणजे कोरोना निवडणूक व राजकारण यांना पोषक आहे. आता आपण २०१८ सालीच्या मृत्युवर लक्ष देऊन बघु. रुग्णालयातील खराब व्यवस्थेमुळे साधारण १६ लाख लोकांचा मृत्यू झाला, आणि त्याच वर्षी वैद्यकीय सेवा मिळाली नाही म्हणून ८ लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे खराब सुविधा कींवा सुविधेच्या अभावामुळे २०१८ साली २४ लाखापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. UNICEF च्या आकडेवारी नुसार २०१८ साली ८.८ लाख पाच वर्षाखालील बाळांचा मृत्यू झालेला आहे.

हा मृत्यू शरीरासाठी आवश्यक असलेले घटक मिळाले नाही, अर्थात कुपोषणामुळे झालेला आहे. इंडीयन एक्स्प्रेस २६ जुलै २०१८ च्या बातमी नुसार दरवर्षी किमान ३ लाख लोकांचा मृत्यु पोटाची भुक न भागल्याने अर्थात उपासमारीने होतो. या तिन लाख लोकांना वाचवण्यासाठी फक्त दोन वेळच्या भाकरेची गरज असते. ती गरज सुद्धा शासन पुर्ण करु शकत नव्हते. जवळपास २४ लाख लोकांचा मृत्यू वैद्यकीय सेवे अभावी होतो आणि सरकार वैद्यकीय सेवा देण्यासाठी अपयशी ठरते. ८.८ लाख बालकांना पोषक घटक मिळत नाही म्हणून जिव गमवावा लागतो यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे. २०१८ मध्ये ४.४ लाख लोकांचा टिबी या आजाराने मृत झाला. टीबी हा सुद्धां संसर्गजन्य आजार आहे, आहे त्याची शेवटची पायरी म्हणजे मृत्यू च आहे. २०१७ मध्ये मलेरिया या आजाराने ४.३५ लाख लोकांचा मृत्यू झाला. मलेरिया सारख्या आजारावर उपचार न करू शकणारा देश कोरोना वर उपचार करतो यात नवल आहेच. २०१५ च्या आकडेवारी नुसार ह्रदय विकाराच्या झटक्याने २१ लाख लोकांचा मृत्यू झाला. २०१८ चा आकडा यापेक्षा जास्त आहे पण तो मिळु शकला नाही. या २१ लाख मृतांचा वयोगट हा ३० वर्षे ते ६९ वर्षे आहे. म्हणजे आज चे दाखवले जाते आहे की तरुण आणि निरोगी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे कारण ह्रदय विकार सुद्धा असु शकतो. दमा मुळे सुद्धा २०१८ मध्ये तिन लाखापेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत परंतु त्याचा योग्य आकडा मिळाला नाही. दरवर्षी २.६ लाख लोक दारूमुळे लिव्हर खराब होऊन मरतात.

वरिल आकडेवारी सांगण्याचा एकच उद्देश आहे की दरवर्षी एक करोड पेक्षा जास्त लोक वेगवेगळ्या आजाराने मृत्युमुखी पडतात. यामध्ये कँन्सर, रस्ते अपघात, प्रेम प्रकरण, डिप्रेशन, वेगवेगळे इंफेक्शन, त्वचेचे आजार यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची आकडे वारी नाहीच. मग दरवर्षी करोडपेक्षा जास्त लोक मरतात, आणि त्यांना मरण्यापासुन वाचवण्यासाठी खर्च सुद्धां जास्त करण्याची गरज पडत नसताना सरकारने कधिच मृतांची आकडेवारी सांगितली नाही, त्यावर उपाय कधि सांगितले नाही. मग सरकार कोरोना बद्दलच मृतांचे आकडे सांगून लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण का करून देत असेल. जेवढे सरकार आज कोरोना मुळे मृतांचा आकडा दाखवत आहे त्यापेक्षा जास्त लोक पोटाला भाकर मिळत नाही म्हणून मरतात. कदाचित याची माहिती सरकार व मिडिया यांना नसेल. राजकीय सभेच्या ठिकाणी न जाणाऱ्या कोरोना ला जरा हातावर पोट असणाऱ्या लोकांकडे जर सरकारने जाऊ दिले नाही तर सर्व आनंदीत राहील. वरिल मृत्यू थांबण्यासाठी लॉकडाऊन करून उपासमारीची वेळ येऊ द्यायची सुद्धा गरज नसताना ज्याने आजपर्यंत करोडो लोक मरत आले त्या आजारा बाबत सरकार एवढे गंभीर झाले नाही तर कोरोना विषयी एवढे गंभीर होऊन मृतांचे आकडे का सांगावे. सांगायचे तर ते पण सांगा आरोग्य सोई न मिळाल्याने किती लोकांचा मृत्यू झाला, जेवन न मिळाल्याने किती मृत्यू झाले. कोरोनाचे षडयंत्र करून राजकीय पोळी भाजून देशाची सत्ता भांडवलदाराकडे देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
*************************************
✒️लेखक:-विनोद सदावर्तेरा. आरेगांव ता. मेहकर(मोबा: ९१३०९७९३००)
*************************************