पुरोगामी पत्रकार संघाच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदी देवराज कोळे यांची निवड

28

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.18एप्रिल):-संपुर्ण महाराष्ट्रात पुरोगामी पञकार संघाकडून विभागिय , जिल्हा, तालूक्याची कार्यकारणी राज्याचे वरिष्ठांकडून घोषणा करण्यात येत आहेत. बीड जिल्हातील गेवराई तालुक्यातील पत्रकार देवराज कोळे यांची राज्य संघटक भागवत वैद्य यांनी कळविले की, बीड जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गेवराई तालूका अध्यक्ष पदावर देवराज कोळे यांची निवड करण्यात आली असून पुढील कार्यकारणी सुध्दा लवकर जाहिर करावी.

या देशातील विविध राज्याच्या कान्याकोप-यात देशाचे चौथे आधार स्तंभ आसलेल्या पत्रकार बांधवांच्या कवच रुपी अनेक संघटना कार्यरत असुन पत्रकारांच्या पाठीशीं खंबीरपणे ऊभे राहुन त्यांच्या विविध समस्याला प्रतिसाद देण्याचे काम ह्या संघांची प्रथम प्राथमिकता आसते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजश्री शाहु महाराज, डाॅं बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा विचार घेऊन पुरोगामी पत्रकार संघाची राज्यभरात गरुडझेपीने राजकिय सामाजिक शेत्रातील वाटचाल झपाट्याने वाढत आहे.

बीड जिल्ह्यातील विविध शेत्रातील समाजाचा आरसा म्हणुन काम करना-या पत्रकारांना एकजुटीची संकल्पना घेऊन राज्य-उपाध्यक्ष प्रा. दशरथजी रोडे ( मुख्य संपादक :जन सन्मान ) यांनी बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात पुरोगामी पत्रकार संघाच्या कार्यकारण्या जाहिर होत असुन *गेवराई तालुका अध्यक्ष पदी देवराज कोळे* यांची *पुरोगामी पञकार संघाचे – संस्थापक अध्यक्ष : विजय सूर्यवंशी* महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सल्लागार समिती राज्य अध्यक्ष माजी न्यायमुर्ती अॕड बी.जी. कोळसे-पाटील , राज्य सल्लागार माजी न्यायमुर्ती अॕड . अनिल वैद्य. मुंबई विभागिय प्रदेशध्यक्ष अॕड संतोष सांझकर यांच्या सल्लामसलत करुन राज्यात कायदेशीर सल्ला पञकारांना वेळोवेळी देण्याकरिता सहमत असतात. तसेच जिल्हा व तालूका कायदेशिर विधी सल्लागार समितीची स्थापना करावी अशी सुचना दिल्या.

यांच्या आदेशानुसार संस्थापक सचिव प्रविण परमार , राज्यध्यक्ष- विनोद पवार. प्रा.दशरथजी रोडे यांनी गेवराई तालूका अध्यक्ष पदी देवराज कोळे यांना नियुक्ती पञ पुढील कार्यासाठी दिले. यावेळी राज्य-संघटक , भागवत वैद्य, विजयकूमार व्हावळ मराठवाडा-अध्यक्ष , स.का. पाटेकर मराठवाडा-उपाध्यक्ष बीड जिल्हाध्यक्ष सुहास सावंत .यांना सुध्दा याबद्दल माहिती देवून गेवराई तालुक्यातील पुढील कार्यकारणी लवकरच जाहिर करण्यासाठी आदेश दिले आहेत . तसेच संघाकडून गेवराई शाखेच्या सर्व सभासदांनी आपले ओळख पञ त्वरित घ्यावे यावर सुध्दा सुचना केली. गेवराई तालुकाध्यक्ष देवराज कोळे यांची संघाच्या वरिष्ठांकडून पदाधिका-यांनी तसेच बीड जिल्हातील जिल्हा पदाधिका-यांनी आणि तालूका पदाधिका-यांनी सामाजिक , राजकिय विविध स्तरातुन अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.