दक्ष पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक व ग्राहक हित सातारा जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या वाहनाची अज्ञाताकडुन तोडफोड

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.२२एप्रिल):- दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या निर्घृण हत्ये चे प्रकरण ताजे असतानाच, त्याच पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक चव्हाण साहेब यांच्या गाडीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,पत्रकार चव्हाण हे वाई येथे आपल्या राहत्या घराच्या तळभागात रात्री उशीरा MH ०२ BM ७७०९ या क्रमांकाचे वाहन पार्क करुन झोपण्यासाठी गेले. असता अंदाजे पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. या मध्ये त्यांचे गाडीचे पुढिल व मागच्या काचा फुटल्या. हि घटना पत्रकार चव्हाण यांना सकाळी समजल्यानंतर त्यांनी तातडीने वाई पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली.

तेव्हा पोलीसांनी CCTV फुटेल असेल तर चेक करा अश्या पद्धतीने उडवाउडवीची उत्तरे दिली खुप पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला. दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या हत्ये पुर्वी त्यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे पोलिसांना कळवले होते. परंतु पोलिसांना परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले यामुळे एका जागरूक पत्रकाराला समाज मुकला.

पत्रकार सुरक्षित वातावरणात काम करु शकत नाहीत. हि फार मोठी शोकांतिका आहे पत्रकार जीवाची बाजी लावून काम करतात परंतु त्यांच्या जीवावर बेतणारा प्रसंग आल्यास प्रशासन योग्य सहकार्य करत नसल्याचे दिसून येते. याबाबत पोलिसांनी कडक कारवाई केल्यास पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता येईल असा संदेश समाजात जाईल व पत्रकार निर्भीड पणे आपल काम करतील.

क्राईम खबर , महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED