कंट्रोल दुकानदारांच्या थम वर ग्राहकांना धान्य वाटप करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

63

🔹राशन वाटप करताना विक्रेता व ग्राहक यांचे थम घेण्यात येते त्यामुळे कोरोना संक्रमण होण्याची शक्यता

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.24एप्रिल):-कंट्रोल दुकानदारांच्या थमवर ग्राहकांना धान्य वाटप करण्याबाबत माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार व जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भावाने थैमान घातले आहे दिवसेंदिवस कोरोना बाधितांमध्ये वाढ होत असून मृत्यूचे सुद्धा प्रमाण वाढत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने मे महिन्यापासून प्रति माणूस ०५ किलो धान्याचा मोफत वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

त्यानुसार स्वस्त धान्य दुकानात अनेक ग्राहकांचा थेट संपर्क एकमेकाशी येतो. शिवाय धान्य वाटप करताना ग्राहकांना थम मशीनवर थम देणे आवश्यक आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढू शकते किंवा कोरोना वाडीमध्ये हेसुद्धा एक कारण राहु शकते. तरी प्रशासनाने दखल घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धान्य दुकानदारांच्या थमवर ग्राहकांना धान्य वितरित करण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानातून धान्य विक्री करताना ग्राहक व विक्रेता यांचे थम घेण्यात येते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.

काही काळासाठी थम बंद करण्यात यावे किंवा धान्य दुकानदारांच्या थमवर धन्य वितरित करण्यात यावी. ग्राहकांची गर्दी लक्षात घेता वारंवार अंगठा निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत काही कालावधीसाठी थम प्रक्रिया थांबविण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार तसेच जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.