राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन टाकी व व्यवस्थेची पाहणी केली

40
✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.25एप्रिल):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टाकी व व्यवस्थेची पाहणी केली.

नुकतीच नाशिक शहरांमध्ये ऑक्सिजन टाकीला गळती होऊन 22 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर माननीय आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्या आदेशाने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन पुरवठा ऑक्सीजन टाकी आदींची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील डॉ. दीपक शेजवळ यांनी याबाबत सविस्तर माहिती देऊन नाशिक सारखी दुर्घटना होणार नाही याची कशी काळजी घेतली जात आहे असे सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर ऑक्सिजन टाकी किंवा टॅन्क नादुरुस्त झाला तर बफर सिलेंडर मधून नळ दाबताच रुग्णांना पर्यायी ऑक्सिजन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ऑक्सिजन सिलेंडर मधील ऑक्सिजनची पातळी कमी होते त्यावेळेस अलार्म ची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून अपघात टाळता येईल. धुळे जिल्ह्याला वाढीव ऑक्सिजन टँक चा पुरवठा करावा तसेच नवीन ऑक्सिजन टॅंक जिल्ह्यात उभारावा अशीही मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली आहे. यावेळी हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ यांनी जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये चांगले काम करीत आहे. त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
यावेळी सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, प्रवक्ता किरण बागुल, युवक जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संजय बगदे, सरचिटणीस वामन मोहिते, प्रवक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव सागर चौगुले, संघटक हासिम कुरेशी, उपाध्यक्ष अस्लम भाई, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राज कोळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष हर्षल ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.