आमदार संतोष बांगर साहेबांनी स्वतःची एफ डी मोडून 90 लाख रुपये इंजेक्शन आणण्यासाठी दिले

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

हिंगोली(दि.25एप्रिल):- शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेबांनी* हिंगोली जिल्ह्यासाठी दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी स्वतःचा एफडी मोडून नव्वद लाख रुपये एका खाजगी वितरकाला दिले कारण हिंगोली जिल्ह्यात कोरोना ने थैमान घातलेले असताना हजारो रुग्ण या इंजेक्शन साठी तडफडत असताना जिल्हा प्रशासन रकमेअभावी रेमडीसीविर हे इंजेक्शन आणण्यास हतबल झाले होते यावेळी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला आमदार संतोष बांगर साहेब धावून आले आणि कोरोना रुग्णांना वेळेवर रेमडीसीविर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी स्वतः एफडी मोडून नव्वद लाख रुपये दिले.

सामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत असताना काही राजकीय मंडळी याचेही क्रेडिट घेण्यासाठी पुढे येत आहेत म्हणून ईच्छा नसतांना देखील मला आपल्या माहितीसाठी हा आर टी जी एस फॉर्म आणि चेकचा फोटो सोबत टाकत आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब हे या काळामध्ये निस्वार्थ जनतेची सेवा करतायत तर दुसरी कडे काही राजकीय नेते मंडळी मात्र फक्त घरी बसून हे मी केलं ते मी केलं अस सांगून खोटी लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपड करतायत दुसरीकडे मात्र काम करणारा नेता कुठेही जाहिरातबाजी करतांना दिसत नाहीत ते फक्त त्यांच्या सेवेत मग्न आहेत.*

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED