भारतीय बौध्द महासभा पूसद शहर शाखा अध्यक्षपदी ल.पु. कांबळे यांची नियुक्ती

30

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26एप्रिल):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळच्या आदेशानुसार पूसद तालुका शाखेचे अध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे यांनी शहर शाखा पुसद अध्यक्ष पदासाठी ल.पु. कांबळे यांची नियुक्ती केली आहे. तसेच सरचिटणीस या पदासाठी अरूण सुर्यतळ यांची नियुक्ती केली आहे. आणि तसेच कोषाध्यक्ष या पदासाठी एस.एम.भगत यांची नियुक्ती केली आहे.

कोरोणा (कोविड-१९)या महामारीचा प्रादुर्भाव हा कमी झाल्यानंतर पुढील सर्वच पदाधिकारी पदाचा भरणा करण्यात येणार आहे.असे जिल्हा शाखेचे सचिव प्रचार व पर्यटन (जिल्हाप्रसिद्धी प्रमुख) बौद्धाचार्य भगवान बरडे तसेच पुसद तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे यांनी सांगितले.