भाजपा युवा मोर्चा रेमडेसीवरच्या अंधाधुंद कारभाराच्या विरोधात रस्त्यावर

30

🔹वेळीच आवर घाला अन्यथा मा पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर आंदोलन-निळकंट चाटे

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.27एप्रिल):-कोरोनाग्रस्त रुग्णांना अॕडमिट करते वेळेस रेमडीसिवर इंजक्शनची डॉक्टराकडुन मागणी केली जात आहे परिनामी रुग्ण व नातेवाईक रेमडिसिवर मिळवण्यासाठी सैरावैरा भटकत आहेत.रेमडीसीवर इंजेक्शन मिळेल त्या किमतीत लोक घेताना दिसत आहेत.यामुळे रेमडिसिवरचा काळाबाजार तेजीत आला असुन वेळीच आवर घाला अन्यथा भाजपा युवा मोर्चा मा पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष निळकंट चाटे यांनी म्हंटले आहे.

या वेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंट चाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परळी शहरातील खाजगी कोवीड केअर सेंटर व मेडीकल स्टोअरला भेटी दिल्या.भेटी दरम्यान डॉक्टर व मेडीकल वाल्यांशी चर्चा केली त्या वेळी रेमडेसिवर इंजेक्शनच्या तुटवड्या बाबत काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली.प्रत्यक्षात कोवीड सेंटरला किती कोरोना रुग्ण अॕडमिट आहेत.त्यातील किती रुग्णांना रेमडेसीवरची अवश्यकता आहे आणी मेडिकल डिस्ट्रिबुटर किती इंजेक्शन कोवीड सेंटरला पुरवतो.

मेडिकल डिस्ट्रिबुटरने कोवीड केअर सेंटरला दिलेल्या इंजेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत असून रेमडिसीवरचा विक्री व वापरात सावळा गोंधळ दिसुन येत आहे उपलब्ध इंजेक्शनचा तुटवडा दाखवुन काळाबाजार तेजीत आणला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंट चाटे यांनी केला आहे. त्यांच्या सोबत भाजपाचे नगर सेवक प्रा पवन मुंडे सर ,संतोष सोळंके ,आश्विन मोगरकर ,सचिन गित्ते, नरसिंग सिरसाठ, बाळासाहेब फड,विजयकुमार खोसे,अशोक मुसळे, विशाल मुंडे,सुरेश सातभाई ,गणेश होळंबे ,विशाल कराड ,दिपक नागरगोजे आदी युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.