✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७
देगलूर(दि.29एप्रिल):-तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या सुरू असलेला covid-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन माजी आमदार सुभाष साबणे साहेब यांनी पुढाकार घेवून खबरदारी उपाय म्हणून मरखेल व माळेगाव परिसरातील गावांमध्ये सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरणाचा प्रभाव वाढू लागल्याने चिंतेत भर पडली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मरखेल , माळेगाव, दावणगीर , हाळी, टाकळी तसेच अनेक गावांमध्ये, अत्यंत अत्यावश्यक सेवा ची गरज भासल्यास बाहेर फिरा नाहीतर घरी रहा सुरक्षित रहा सोडियम हायहायड्रोक्लोराइडची फवारणी करत आपल्या मतदारसंघातील विषाणू मुक्तीचा प्रयत्न करत आहोत तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान माजी आमदार सुभाष साबणे साहेब यांनी केले आहे.
त्यावेळेस युवासेना जिल्हा प्रमुख विक्रमजी साबणे , युवासेना तालुकाप्रमुख सचिन पाटील, उपसरपंच संदीप पाटील , सोसायटी चेअरमन सुरेश चिल्वरी, मानवी हक्क जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले माजी पंचायत समिती सदस्य पप्पू रेड्डी अर्धे, युवासेना उपतालुका प्रमुख मारुती मोरेवाड, इतर गावातील नागरिक उपस्थित होते