कोरोना रूग्णांच्या मदतीला धावला सवंगडी कट्टा

36

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30एप्रिल):-शहरातील सवंगडी कट्टा सतत वेगवेगळे व नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड या ठिकाणी असलेल्या कोरोना केअर सेंटर वर कोरोना आजाराशी संबंधित औषधांचा मागील काही दिवसांपासून तुटवडा भासत होता ही गोष्ट लक्षात घेऊन सवंगडी कट्टाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारची औषधे ज्यामध्ये आइवर मक्टिन टॅबलेट, अज़ीथ्रोमायसिन , विटामिन सी, बी कॉम्प्लेक्स तसेच वैपोरायज़र अशा एकूण सरासरी 40 हजार रुपये किमतीची औषधे दिनांक 29 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आली. याप्रसंगी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. केशव मुंढे, डॉ. योगेश मल्लुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना डॉ केशव मुंडे यांनी असे सांगितले की कमीत कमी आठ ते दहा दिवस हा औषध साठा कोरोना रूग्णांसाठी उपयोगी पडेल व याबद्दल त्यांनी सवंगडी कट्टा च्या सदस्यांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. मुंजाजी चोरघडे, प्रशांत शिंदे, रमेश औसेकर, संतोष तापडिया, गोविंद यादव, नागेश पैठणकर यांनी प्रयत्न केले. तर याप्रसंगी मनोज नावेकर,गोपाळ मंत्री, एडवोकेट पंकज भंडारी ,कारभारी नीरस , साहेबराव चौधरी ,सोनू आय्या, डॉ.पारस जैन ,दत्ता यानपल्लेवार, माऊली पारसेवार, डॉ.संजय भरड, ओमप्रकाश घण, गोपी मुंडे, तुळशीराम मुधोळकर, संजय धर्माधिकारी, अजय सुपेकर, रमेश पेकम ,शिवदास फुलवळकर, सुहास देशमाने, मंजुश्री दर्डा, परमार, मयूर कुलकर्णी, रणजीत जयस्वाल, अजय बंग, सचिन सुरवसे, सचिन हराळे, बेंजामिन अवचिते ,राजकुमार फड ,अतुल तुपकर, अक्षय जैन, गजानन महाजन, डॉ. सचिन सुपेकर ,प्रवीण जायभाये, प्रा. टेकाळे , अन्वर शेख लिंबेकर ,सुनील कोनार्डे आदि सवंगडी सदस्यांची उपस्थिती होती.