पुसदच्या दिलदार भूमीपुत्राने उभारले भव्य कोविड सेंटर

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.1मे):-पुसदच्या लौकिकाला साजेशे तीन आमदार व एक खासदार लाभले असतांना कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची दखल घेऊन पुसद अर्बन बँकेचे कुशल, व कर्तबगार, अध्यक्ष मा,शरदभाऊ मैन्द यांनी अवघ्या तीन दिवसात तब्बल १०० खाटांचे रुग्णालय पुसद येथील माहूर रोड स्थित गणोबा मंगलकार्यालय येथे उभारून आपले सामाजिक दायित्व स्वीकारले.

सदर बाब अत्यंत कौतुकास्पद असून पुसद परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.एरव्ही सुद्धा कुठलाही सामाजिक उपक्रम म्हटला कि आयोजक आदरणीय शरदभाऊ मैंद यांच्याकडे हक्काने जातात आणि भाऊ सुद्धा भरीव मदत करून आयोजकांत उत्साह निर्माण करतात.

याचाच परिपाक म्हणून जनता सुद्धा आदरणीय श्री शरदभाऊ मैन्द यांच्याकडे सहकार महर्षी गरीबोका दाता म्हणूनच पाहतात व त्याच विश्वासाने भाऊंनी पुसद अर्बन बँकेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर विणून एक विश्वासहर्ता निर्माण केले आहेत. अशा उदारमतवादी दिलदार राजास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!! आणि परत एकदा कोरोनासारख्या महामारीत पुसदकरांना भव्य कोविड सेन्टर उभारून जो मायेचा आपुलकीचा आणि आपलेपणाचा दिलासा दिला त्याबद्दल पुसदकरांच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED