महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांच्या खात्यावर किमान १० हजार रुपये जमा करण्याची महाराष्ट्र पत्रकार संघाची मागणी

कोरोना काळात सर्वच घटकातील उद्योगाला सरकार थोडीफार मदत करत असून , या काळात देशाचा चौथा खांब दुर्लक्षित झाला आहे, सरकारने पत्रकारांच्या उदरनिर्वाहासाठी किमान पाचशे कोटींचे पॅकेज जाहीर करून प्रत्येक पत्रकाराच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली असुन उद्या सोमवारी 3मे रोजी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्यातून निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

इतर उद्योगाप्रमाणे पत्रकारितेतील व्यवसायांना सुद्धा कोरोना सारख्या महामारी या आजाराचा फटका बसला असून सरसकट पत्रकारांना सरकारने मदत करावी. पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे छोटी-मोठी वृत्तपत्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे, यामुळे छोट्या-मोठ्या पत्रकार संपादकांनी आपली आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चहा विक्री करून जिवन पुढे ढकलत आहेत.

द शिराळा न्यूजचे संपादक नवनाथ पाटील यांची व्यथा काळजाला पाझर फोडणारी ठरली असून, समाजाला दिशा देणारा पत्रकार, आज पोटाच्या खळगी भरण्यासाठी दिशा हीन झाला आहे. कोरोना काळात पत्रकारितेला जीवदान देण्यासाठी शासनाने पत्रकारांच्यासाठी ५०० कोटी चे पॅकेज जाहीर करून प्रत्येक पत्रकारांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करावे अशी मागणी शासनाकडे करण्यात येत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED